Mumbai High Tide Today: मुंबईच्या समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा; पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज (Watch Video)
ANI या वृत्त संस्थेने या वेळेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बीएमसीच्या माहितीनुसार आज समुद्रात 4.51 मीटर उंचीच्या लाटा (High Tide In Mumbai Today) उसळल्या होत्या.
Mumbai Rain: मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांंना सोमवार रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अजुनही मुंबई उपनगरीय भागात जोरदार पाउस सुरु आहे. तर पुढील तीन तासात पावसाचा जोर आणखीन वाढण्याचे अंंदाज हवामान खात्याने वर्तवले आहे. अशातच आता काही वेळापुर्वी मुंंबईच्या समुद्रात भरतीच्या उंच लाटा उसळताना पाहायला मिळाल्या. ANI या वृत्त संस्थेने या वेळेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बीएमसीच्या माहितीनुसार आज समुद्रात 4.51 मीटर उंचीच्या लाटा (High Tide In Mumbai Today) उसळल्या होत्या. दुसरीकडे आज हवामान खात्याने मुंंबई (Mumbai) , ठाणे (Thane) , कोकण (Konkan) , रायगड (Raigad) या भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. आज आणि उद्या म्हणजेच पुढील 48 तास मुंबई व जवळच्या भागात मुसळधार पाउस होण्याची शक्यता आहे.मुंंबईत पावसामुळे पाणी साचुन झालेल्या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ पाहा.
कालपासुन सुरु असलेल्या पावसाने मुंंबईतील जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. हिंदमाता, परेल, अंधेरी, किंग्स सर्कल भागात पाणी साचले असुन गोरेगाव, कांदिवली, मीरा रोड या भागात काही घरांंमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. तितकाच प्रभाव मुंबईच्या वाहतुक यंत्रणावर सुद्धा झाला असुन, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे च्या लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. BEST बसचे सुद्धा मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबई वाहतुक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात केलेले बदल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Mumbai High Tide Video
दरम्यान, आज पावसामुळे सरकारी कामकाजात सुद्धा अडथळे येत आहेत. आजच्या दिवसासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तर, मुंंबई उच्च न्यायालयात आज सुशांंत सिंह राजपुत प्रकरण सीबीआय कडे सोपावण्याच्या प्रकरणाची सुनावणी सुद्धा रद्द झाली आहे.