धारावी मध्ये आढळले 33 नवे COVID-19 रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 665 वर

मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात आज 33 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या परिसरात आतापर्यंत 665 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Mumbai. (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून सद्य स्थितीत 14,541 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण असून मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ही 9,310 इतकी मोठी आहे. मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात आज 33 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या परिसरात आतापर्यंत 665 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. यातील 196 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

मुंबईतील धारावी हा परिसर खूप दाटीवाटीचा असून येथे खूप जास्त प्रमाणात लोक राहतात. त्यामुळे येथील रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ही परिसस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. Coronavirus: पुण्यात आज 99 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2202 वर पोहोचली

सद्य स्थितीत भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 46,711 वर पोहोचली असून एकूण 1,583 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात 31,967 रुग्ण सध्या उपचार घेत असून 13,160 रुग्ण बरे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

यात दिलासादायक गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रात एकूण 2465 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वोत मोठी आकडेवारी आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा आपण लवकर जिंकू असा विश्वास व्यक्त केला जातोय.