Mumbai: वर्सोवा येथे अपार्टमेंटच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून 32 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
दोस्ती फ्लेमिंगो नावाने ओळखल्या जाणाऱ्या अपार्टमेंटमधून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती इमारतीच्या चौकीदाराने पोलिसांना दिली. माहिती मिळताच रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Mumbai: वर्सोवा (Versova) येथील एका 32 वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्याच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील शिवडी येथील एका उच्चभ्रू अपार्टमेंटच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दोस्ती फ्लेमिंगो (Dosti Flamingos Apartment) नावाने ओळखल्या जाणाऱ्या अपार्टमेंटमधून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती इमारतीच्या चौकीदाराने पोलिसांना दिली. माहिती मिळताच रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. (हेही वाचा -Thane Shocker: राहत्या घरात आढळला वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह, हत्येचा संशय, ठाण्यातील धक्कादायक घटना)
दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'जेव्हा तरुणाने हे दुःखद पाऊल उचलले, तेव्हा त्याचे इतर मित्र त्याच्या खोलीत उपस्थित होते. पोलीस खोलीत उपस्थित असलेल्या त्याच्या तीन मित्रांची चौकशी करत आहेत. हे सर्व मित्र रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होते.' (हेही वाचा - Yavatmal Crime News: दारूसाठी तीन वर्षांचं पोरगं विकलं, मित्रांसोबत पार्टी केली, यवतमाळमधील बापाचे कृत्य)
तथापी, या तरुणाने आत्महत्येसारखे कठोर पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस करत आहेत. या तरुणाकडून कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट पोलिसांना सापडलेली नाही. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2024 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

