Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहात असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना संक्रमित रुग्ण, जाणून घ्या ताजे अपडेट्स

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची मनपा/ जिल्हानिहाय आकडेवारी (30 मे 2020 रात्री 8 पर्यंत)

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) हा भीषण विषाणू आपले जाळे झपाट्याने पसरवत चालला आहे याची प्रचिती कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढत जाणा-या आकडेवारीवरून येते. महाराष्ट्रात (Maharashtra) काल (30 मे) 2940 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ तसेच 99 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 65,168 वर पोहचला असून एकूण 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. याबााबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्यात लॉकडाऊन (Lockdown 5.0) 30 जून पर्यंत वाढविण्यात आला आहे किंबहुना देशभरातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. कंटेनमेंट झोन वगळता अन्य झोन्समध्ये काही अटींनुसार दुकाने, चित्रपटगृह आदि गोष्टी सुरु करण्यास परवानगी मिळाली.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत असून एकूण संख्या 38,220 इतकी आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. Coronavirus: मुंबईत एकूण 38 हजार 220 जणांना कोरोनाची लागण; गेल्या 24 तासात 1 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद तर, 54 मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची मनपा/ जिल्हानिहाय आकडेवारी (30 मे 2020 रात्री 8 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 38442 1227 16364
ठाणे 9123 182 2973
पुणे 7537 320 3559
औरंगाबाद 1462 65 986
नाशिक 1111 60 893
रायगड 1042 39 549
पालघर 968 30 329
सोलापुर 872 68 353
जळगाव 607 72 272
अकोला  571 28 289
नागपुर 556 10 353
सातारा 490 16 148
कोल्हापुर 429 4 104
रत्नागिरी 242 5 90
अमरावती 213 16 121
हिंगोली 149 0 97
धुळे 140 16 71
यवतमाळ 130 0 92
जालना 119 0 45
लातुर 118 3 55
नांदेड 108 6 86
सांगली 112 1 55
अहमदनगर 108 6 57
उस्मानाबाद 66 0 18
गोंंदिया 61 0 28
बुलढाणा 58 3 29
बीड 46 0 5
परभणी 57 1 3
नंदुरबार 34 3 20
गडचिरोली 32 0 8
भंडारा  29 0 1
चंद्रपुर  25 0 15
सिंधुदुर्ग 33 0 7
वर्धा 11 1 0
वाशिम 8 0 6
अन्य जिल्हे 59 15 0
एकुण 65,168 2197 28081

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत. भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,73,763 वर जाऊन पोहोचली आहे.