पत्नीचा न्यूड फोटो अपलोड केल्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून अटक

पीडीतेला या प्रकराची माहिती मिळताच तिने पोलिसांत तक्रार केली आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सोशल नेटवर्किंग वेबसाईट वर 30 वर्षीय तरूणाने आपल्या पत्नीचा न्यूड फोटो तिच्या मोबाईल क्रमांकासह शेअर केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आहे. TOI च्या वृत्तानुसार, पवई पोलिसांनी (Powai Police) 29 जुलै दिवशी याबाबत एक एफआयआर नोंदवला आहे. तरूण पटना चा आहे तर 28 वर्षीय तरूणी मुंबईच्या पवई (Powai) भागातील आहे. एका डाटा लॅब फर्म मध्ये ती काम करते. अनोळखी फोन नंबर वरून तिला कॉल आल्यानंतर हा प्रकार प्रकाशझोतात आला.

पीडितेला 5 जुलैला आलेल्या कॉलमध्ये तुझी बॉडी सुंदर आहे, पोटावरचा टॅटू देखील मस्त असल्याची टीपण्णी त्याने केली होती. कॉल केलेल्या व्यक्तीने एका अ‍ॅपवर मेसेज, फोटो आणि नंबर मिळाल्याचं म्हटलं आहे. यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. ही तरूणी मुंबईत राहते तर पती तिच्यापासून वेगळा पटना मध्ये राहतो. हे देखील नक्की वाचा: आई-मुलाच्या नात्याला काळिमा; 50 वर्षीय व्यक्तीने आईचे नग्न फोटो पाठवले नातेवाईकांच्या WhatsApp ग्रुपवर, प्रॉपर्टीसाठी करत होता ब्लॅकमेल .

मागील वर्षी देखील त्रास दिल्याप्रकरणी या पीडीतेने पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी पती दबाव निर्माण करत असल्याचं तिने म्हटलं आहे. पत्नीने तक्रार मागे घेतली नाही तर तिला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असं म्हटलं आहे. सध्या पोलिस पीडीतेचा न्यूड फोटो कुठून अपलोड करण्यात आला आहे तो आयपी आयड्रेस वरून ट्रेस करत आहेत.