Mumbai Shocker: फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये 30 वर्षीय तरूणीवर बर्थ डे दिवशी बलात्कार; गुन्हा दाखल

सेक्शन 328 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही अटक झालेली नाही.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये बर्थ डे सेलिब्रेशन साठी गेलेल्या तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वरळीतील एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये घडला आहे. पीडीतेने तिच्यावर नजिकच्या व्यक्तीने ड्रिंक देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. बलात्कार केलेल्या व्यक्तीचं नाव अवीन अग्रवाल आहे.

दरम्यान बलात्कार पीडीता ही पश्चिम मुंबईतील रहिवासी आहे. काल अग्रवाल विरूद्ध पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, मागील महिन्यात या दोघांची एका डेटिंग अ‍ॅप वर भेट झाली होती. नंतर अनेकदा चॅटिंग मधून एकमेकांच्या संपर्कात होते. तक्रारीमध्ये महिलेने दिलेल्या माहिती मध्ये त्या मुलाकडून बर्थ डे पार्टी दिल्याचं म्हटलं आहे.

सोमवारी त्या तरूणीला आरोपीने हॉटेलच्या रूमवर बोलावले होते. 26 जुलैला 7 च्या सुमारास ती पोहचली. त्यानंतर तरूणीला त्याने वाईन ऑफर केली. त्यानंतर तिला थकल्यासारखं वाटलं आणि नंतर लैंगिक अत्याचार झाले. असे मीडीया सोबत बोलताना पोलिसांनी म्हटलं आहे. Mumbai Rape: बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली 2 वकिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल.

तरूणीवर सध्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. सेक्शन 328 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही अटक झालेली नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif