Leopards Death in Nashik: नाशिकमध्ये एकाच दिवशी 3 बिबट्यांचा मृत्यू

या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Leopard प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikimedia commons)

Leopards Death in Nashik: नाशिक जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिक (Nashik) मध्ये एकाच दिवशी तीन बिबट्यांचा (Leopards) वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मोठ्या बिबट्याने छोट्या बछड्यावर हल्ला केल्याने बछड्याचा मृत्यू झाला. तर महामार्गावर वाहनाच्या धडकेतही एका बिबट्याचा मृत्यू झाला. तसेच गेल्या एक महिन्यांपासून मरणासन्न अवस्थेत उपचार सुरू असलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी राजूरबहुला येथील मुंबई आग्रा- महामार्गावरुन पाच ते सहा वर्षांचा नर बिबट्या रस्ता ओलांडत होता. यावेळ या बिबट्याल भरधाव वेगात असलेल्या वाहनाने धडक दिवी. यात बिबट्या गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: राज्यात आज 660 कोरोना बाधित रुग्णांची नोंद; 2 जणांचा मृत्यू)

याशिवाय नाशिकमधील बेळगाव ढगा येथे बिबट्यांच्या झुंझीत चार महिन्यांच्या बिबट मादीचा मृत्यू झाला. या मोठ्या बिबट्याने मादीचा चावा घेतला. यात मादी बिबटचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मादी बिबट्याचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, गेल्या एक महिन्यांपासून मरणासन्न अवस्थेत सापडलेल्या दीड वर्षीय बिबट मादीला वनविभागाने रेस्क्यू केलं होतं. संगमनेर उपवन विभागाने या मादीला नाशिकमधील वन्य प्राणी उपचार केंद्र दाखल केलं होतं. या बिबट मादीवर उपचार सुरू होते. मात्र, शविवारी उपचारादरम्यान, या मादी बिबटचा मृत्यू झाला. अशा प्रकारे एकाच दिवशी तीन बिबट्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif