नाशिक: सातपूर येथे पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू; एक जखमी

नाशिक येथील सातपूर भागात पाण्याची टाकी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

आज सकाळपासूनच राज्याच्या विविध भागात दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकर बेजार झालेले असताना मालाड आणि कल्याण येथे भिंत कोसळून काहीजणांचा मृत्यू झाला. तर पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ भिंत कोसळून सहा मजूरांचा मृत्यू झाला. या सर्व घटना ताज्या असतानाच नाशिक (Nashik) येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिक येथील सातपूर (Satpur) भागात पाण्याची टाकी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे.

ANI ट्विट:

या प्रकरणाची सखोल चौकशी करुन जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.