Coronavirus: महाराष्ट्र पोलिस दलात 264 पोलिसांना कोरोनाची लागण, पाहा एकूण आकडेवारी

यामुळे आतापर्यंत एकूण 11,392 महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून 121 जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus) स्थिती आटोक्यात येईपर्यंत लोकांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणारे महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मागील 24 तासांत 264 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 3 जण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आतापर्यंत एकूण 11,392 महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून 121 जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत 9187 महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून 2084 पोलिसांवर सद्य घडीला उपचार सुरु आहेत.

तर दुसरीकडे राज्यात काल (11 ऑगस्ट) दिवसभरात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेले 1,48,553 रुग्ण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. राज्यात काल दिवसभरात 10,014 रुग्ण बरे झाले असून3 लाख 68 हजार 435 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

तर भारतात मागील 24 तासांत 60,963 कोरोनाचे रुग्ण दगावले असून 834 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुले देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 23,29,639 वर पोहोचली असून 46,091 दगावल्याची माहिती मिळत आहे.