Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (11 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या संख्येसह बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. राज्यात काल (11 ऑगस्ट) दिवसभरात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेले 1,48,553 रुग्ण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. राज्यात काल दिवसभरात 10,014 रुग्ण बरे झाले असून3 लाख 68 हजार 435 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.79 टक्के इतके झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या मुंबईत (Mumbai) असून त्यापाठोपाठ ठाणे (Thane), पुणे (Pune), पालघर (Palghar) मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. मागील 5 महिन्यांपासून राज्यात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून नागरिकांनी देखील सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (11 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
१ मुंबई मनपा 125224 68943
२ ठाणे 15649 404
३ ठाणे मनपा 23,087 818
४ नवी मुंबई मनपा 20853 513
५ कल्याण डोंबिवली मनपा 25660 539
६ उल्हासनगर मनपा 7401 200
७ भिवंडी निजामपूर मनपा 4034 282
८ मीरा भाईंदर 10254 336
९ पालघर 5033 72
१० वसई विरार मनपा 14016 369
११ रायगड 11970 321
१२ पनवेल मनपा 8923 215
ठाणे मंडळ एकूण 272104 10962
१ नाशिक 5152 146
२ नाशिक मनपा 14565 347
३ मालेगाव मनपा 1728 95
४ अहमदनगर 5792 78
५ अहमदनगर मनपा 4608 31
६ धुळे 2107 65
७ धुळे मनपा 2166 65
८ जळगाव 11283 507
९ जळगाव मनपा 4081 116
१० नंदुरबार 965 46
नाशिक मंडळ एकूण 52447 1496
१ पुणे 14096 435
२ पुणे मनपा 72640 1862
३ पिंप्री-चिंचवड मनपा 29910 527
४ सोलापूर 6799 194
५ सोलापूर मनपा 5657 400
६ सातारा 5959 178
पुणे मंडळ एकुण 135061 3596
१ कोल्हापूर 7664 192
२ कोल्हापूर मनपा 2878 65
३ सांगली 1867 62
४ सांगली मिरज कुपवाड मनपा 3150 83
५ सिंधुदुर्ग 504 9
६ रत्नागिरी 2307 88
कोल्हापूर मंडळ एकुण 18370 499
१ औरंगाबाद 5280 87
२ औरंगाबाद मनप 11610 466
३ जालना 2676 97
४ हिंगोली 835 18
५ परभणी 618 22
६ परभणी मनपा 554 18
औरंगाबाद मंडळ एकूण 21573 708
१ लातूर 2635 91
२ लातूर मनपा 1529 62
३ उस्मानाबाद 2737 66
५ बीड 2139 39
६ नांदेड 1965 54
७ नांदेड मनपा 1370 61
लातूर मंडळ एकूण 12375 373
१ अकोला 1158 46
२ अकोला मनपा 1901 84
३ अमरावती 664 28
४ अमवरावती मनपा 2358 58
५ यवतमाळ 1615 45
६ बुलढाणा 2011 54
७ वाशीम 976 18
अकोला मंडळ एकूण 10683 333
१ नागपूर 3049 43
२ नागपूर मनपा 6787 220
३ वर्धा 293 10
४ भंडारा 413 2
५ गोंदिया 654 4
६ चंद्रपूर 584 1
७ चंद्रपूर मनपा 214 1
८ गडचिरोली 443 2
नागपूर मंडळ एकूण 12437 283
१ इतर राज्य 551 56
एकूण 535601 18306

तर भारतात मागील 24 तासांत 60,963 कोरोनाचे रुग्ण दगावले असून 834 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुले देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 23,29,639 वर पोहोचली असून 46,091 दगावल्याची माहिती मिळत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2020 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).