26/11 Mumbai Attack ला 13 वर्ष पूर्ण, राजकीय नेत्यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या 10 जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये नागरिकांना लक्ष करत त्यांच्यावर गोळीबार केला.
26/11 Mumbai Attack: मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या 10 जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये नागरिकांना लक्ष करत त्यांच्यावर गोळीबार केला. त्याचसोबत बॉम्ब स्फोट सुद्धा घडवून आणला. इतिहासातील सर्वाधिक भीषण आणि भयावह अशा या दहशतवादी हल्ल्यामुळे आज ही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. या हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमावावा लागला तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ताज हॉटेलचा 26/11 च्या स्थितीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ताजला भीषण आग लागली असून त्यामधून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. यापुढे त्यांनी असे म्हटले की, कधीच विसरणार नाही.(PM Narendra Modi on Constitution: भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
Tweet:
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले की, 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीदांना विनम्र श्रद्धांजली. तसेच या स्थितीला ठामपणे सामोरे जाणाऱ्या वीर सुरक्षकारक्षांना सुद्धा नमन.
Tweet:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी सुद्धा 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व नागरिकांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. त्यांचा त्याग व बलिदानाची जाणिव ठेवूयात.. हा देश भयमुक्त करण्यासाठी काम करुयात. शहिदांना विनम्र अभिवादन.(26/11 Mumbai Terror Attack: मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या 'या' शूरवीरांबद्दल अधिक जाणून घेत करुयात त्यांच्या कार्याला सलाम)
Tweet:
नितेश राणे यांनी असे म्हटले की, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
Tweet:
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ट्विट:
Tweet:
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली.
Tweet:
पाकिस्तान-आधारित अतिरेकी इस्लामी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या 10 सदस्यांनी केलेल्या 12 समन्वित हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची आठवण आजची प्रत्येक मुंबईकरांच्या मनात जिवंत आहे. 12 हल्ल्यांपैकी आठ हल्ले दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताज पॅलेस अँड टॉवर, लिओपोल्ड कॅफे, मुंबई चाबड हाऊस, नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटल, मेट्रो सिनेमा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घडले. टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंग आणि सेंट झेविअर्स कॉलेजच्या मागच्या गल्लीत दोन हल्ले, मझागाव भागात स्फोट आणि विलेपार्ले येथील टॅक्सीमध्ये बॉम्ब स्फोट करवण्यात आला. 10 हल्लेखोरांपैकी 9 ठार झाले आणि एक अजमल कसाब याला पकड्ण्यातव सुरक्षा दलाला यश आले. कसाबला 2012 मध्ये पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)