Fraud: कल्याणमध्ये बोगस कंपनी तयार करून अनेकांची फसवणूक, 26 वर्षीय तरुण अटकेत

रेडिसने अॅग्रो मल्टी स्टेट कं. हाउसिंग सोसायटी लिमिटेड नावाची कंपनी तयार केली होती.

fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

बोगस कंपनी (Bogus company) तयार करून गुंतवलेल्या पैशांवर दुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवल्या (Fraud) प्रकरणी 26 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली. कल्याणच्या (Kalyan) खडकपाडा येथील 57 वर्षीय तक्रारदाराची ठाण्यात आरोपी आदित्य रेडिसची भेट झाली. रेडिसने अॅग्रो मल्टी स्टेट कं. हाउसिंग सोसायटी लिमिटेड नावाची कंपनी तयार केली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने अनेक लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले आणि त्यावर दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराने हळूहळू आपली सर्व बचत गुंतवली आणि अधिक फायदे मिळविण्यासाठी त्याच्या काही मित्रांना त्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. तक्रारदार आणि त्याच्या दोन मित्रांनी सुमारे  35 लाखांची गुंतवणूक केली.

डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिसांनी 2020 मध्ये या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान असे आढळून आले की अशा नऊ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना या व्यक्तीने याच पद्धतीचा वापर करून लुटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून आरोपींचा शोध घेत होते. हेही वाचा रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रवासी आणि स्कूल बसमध्ये फायर अलार्म यंत्रणा बसवणे केले बंधनकारक, अपघात रोखण्यास होणार मदत

नुकतीच, त्यांना आरोपी बदलापूरजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली आणि पथकाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. ईओडब्ल्यूच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आरोपीला बदलापूर येथून अटक करून न्यायालयात हजर केले. तो बराच वेळ तिथे लपून बसला होता. त्याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.