IPL Auction 2025 Live

Dry Days In Mumbai 2020: मकरसंक्रांती , होळी, गणेशोत्सव, एकादशी धरून यंदा वर्षभरात 26 ड्राय डे; पहा महिन्यानुसार पूर्ण यादी

यंदाच्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये राष्ट्रीय सणांचे दिवस, सण उत्सव इत्यादी धरून तब्बल 26 दिवस मुंबईत ड्राय डे (Dry Day) पाळला जाणार आहे.

Dry Day (Photo Credit - File Phto )

यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीला 31st च्या रात्री संपूर्ण रात्र दारू विक्रीस मंजुरी देऊन सरकारतर्फे तळीराम मंडळींना दणकेदार न्यू इयर (New Year) गिफ्ट मिळाले होते, पण याची मजा आणि नशा आता उतरवेल अशी एक माहिती आम्ही आज देणार आहोत. यंदाच्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये राष्ट्रीय सणांचे दिवस, सण उत्सव इत्यादी धरून तब्बल 26 दिवस मुंबईत ड्राय डे (Dry Day) पाळला जाणार आहे. यामध्ये प्रतिवर्षीप्रमणे महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) , गणेशोत्सव (Ganeshotsav) , एकादशी (Ekadashi) , होळी (Holi) , महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  जयंती/ पुण्यतिथी इत्यादी दिवशी दारू विक्री बंद असणार आहे. 'ड्राय डे' दिवशी दारूची सोय करण्यासाठी ऑनलाईन खरेदी पडली महागात; तब्बल 38 हजारांचा फटका

ऐन सणाच्या दिवसाने मिळणाऱ्या सुट्टीत अनेकजण आपल्या मित्रांसोबत पार्ट्यांचे प्लॅनिंग करत असतात, यंदाही असे अनेक लॉन्ग वीकएंड आणि सुट्ट्यांचे दिवस येणार आहेत, पण हे दिवस नेमके ड्राय डे च्या यादीत मोडत नाहीत ना? याची एकदा खात्री करून घ्या. ऐन वेळी होणारी पंचाईत टाळण्यासाठी तपासून पहा महिन्यानुसार ड्राय डेची संपूर्ण यादी..  आरोग्यासाठी दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे बिअर; PETA ने केला दावा, जाणून घ्या कारणे

जानेवारी

15 जानेवारी- मकरसंक्रांती

26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन

30 जानेवारी- शहिद दिन (महात्मा गांधी पुण्यतिथी)

फेब्रुवारी

18 फेब्रुवारी - स्वामी दयानंद सरस्वती जयंती

19 फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती

21 फेब्रुवारी - महाशिवरात्री

मार्च

10 मार्च - होळी

एप्रिल

2 एप्रिल- रामनवमी

6 एप्रिल - महावीर जयंती

10 एप्रिल - गुड फ्रायडे

मे

1  मे - महाराष्ट्र दिन

7 मे - बुद्ध पौर्णिमा

25  मे- ईद- उल- फितर

जुलै

1 जुलै- आषाढी एकादशी

31  जुलै- बकरी ईद

ऑगस्ट

12 ऑगस्ट - जन्माष्टमी

15 ऑगस्ट- स्वतंत्रता दिवस

21 ऑगस्ट- गणेश चतुर्थी

29 ऑगस्ट- मोहरम

सप्टेंबर

1 सप्टेंबर- गणेश विसर्जन

ऑक्टोबर

2 ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती

8 ऑक्टोबर - दारू प्रतिबंधक आठवडा

25 ऑक्टोबर- दसरा

31 ऑक्टोबर- वाल्मिकी जयंती

नोव्हेंबर

25 नोव्हेंबर - कार्तिकी एकादशी

30 नोव्हेंबर - गुरु नानक जयंती

ड्राय डे च्या दिवशी परिसरातील सरकारी परवाना असणाऱ्या दुकानात दारू विक्री बंद ठेवण्यात येते. काही वेळा अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने दारूविक्री होते मात्र परवनाविना दुकानातून दारू खरेदी ही आरोग्याला मारक ठरू शकते.