COVID19: पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मधील 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
यामध्ये 19 परिचारिकांचा समावेश आहे. याविषयी क्लिनिकच्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष बोमी भोटे (Bomi Bhote) यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
पुणे (Pune) येथील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) मधील 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. यामध्ये 19 परिचारिकांचा समावेश आहे. याविषयी क्लिनिकच्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष बोमी भोटे (Bomi Bhote) यांनी अधिकृत माहिती दिली आहे. अलिकडेच रुबी हॉल रुग्णालयातील एका 45 वर्षीय परिचारीकेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 30 परिचारिकांना क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आले होते.महाराष्ट्रात सर्वात आधी पुणे येथे कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. त्यानंतर अजूनही पुणे जिल्हयात रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव नाही. Coronavirus Outbreak: कोरोना रुग्णांची संख्या 18,601 वर; आतापर्यंत 590 जणांचा मृत्यू, पहा आजची आकडेवारी
आज घडीला पुणे जिल्हयात कोरोना बधितांची संख्या 663 वर पोहोचली आहे. काल (20 एप्रिल) दिवशी एकूण 52 बाधितांची भर पडल्याचे समजत आहे. केंद्र सरकारतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे.
ANI ट्विट
यापूर्वीही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असताना अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडेच मुंबईतील जसलोक रुग्णालयात 31 नर्स आणि 5 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती
दरम्यान, महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.मागील 24 तासात राज्यात 472 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत,तसेच 9 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 4647 वर पोहचली आहे तर मृतांचा आकडा हा 232 वर पोहचला आहे.