Palghar Mob Lynching Case: पालघर साधू हत्याकांड प्रकरणी CID कडून 24 नव्या आरोपींना अटक; आज कोर्टात हजर करणार
या आरोपींना कोर्टात उभं केले जाईल. तर याप्रकरणामध्ये एकूण 178 आरोपींना अटक झाली आहे.
एप्रिल महिन्यात 2 साधू सह 1 ड्रायव्हर अशा 3 जणांची पालघर मध्ये बेदम माराहाण करून हत्या झाल्याने सर्वत्र देशभर खळबळ माजली होती. या घटनेचे तीव्र पडसाद पाहता अनेक पोलिसांच्या बदल्या तर काहींना निलंबनाला सामोरे जावे लागले. सध्या सीआयडीकडे त्याचा तपास असून आज 24 नव्या आरोपींची यामध्ये अटक झाली आहे. या आरोपींना कोर्टात उभं केले जाईल. तर याप्रकरणामध्ये एकूण 178 आरोपींना अटक झाली आहे. यामध्ये 3 FIRs देखील दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती CID ऑफिसर Irfan Shaikh यांनी दिली आहे.
दरम्यान जनहित याचिकांच्या माध्यमातून या पालघर साधू हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये सीबीआय किंवा SIT ने तपास करावा अशी मागणी जोर धरत होती. ही हत्या 16 एप्रिलला झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाला वेग आला आहे.
16 एप्रिलच्या रात्री साधू आणि त्यांचा ड्रायव्हर मुंबईच्या कांदिवली मधून सुरतकडे प्रवास करत होते. त्यावेळेस देशात कोरोना वायरस लॉकडाऊन होता. ही मंडळी एका अंत्यविधीसाठी जात होते. त्यांची गाडी गावात थांबली आणि गडचिंचले येथे त्यांच्यावर हल्ला झाला. त्यामध्ये बेदम मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यू पावलेल्या व्यक्तींमध्ये सुशीलगिरी महाराज (वय 30), चिकणे महाराज कल्पवृक्ष गिरी (वय 70) आणि त्यांचा चालक निलेश तेलवडे (वय 30) यांचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पालघर मधील घटनेतील आरोपींना शक्य तितकी कठोर शिक्षा होईल असे स्पष्ट केले आहे.