मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सातही आरोपींवरील आरोप निश्चित
यात बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. याच प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने सर्वच्या सर्व सातही आरोपींवरील आरोप निश्चित केले आहेत. या आरोपींवर दहशतवादी करवायांचा कट करणे, हत्या आणि इतर गुन्ह्यांबाबतचे आरोप आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावनी २ नोव्हेंबरला होणार आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील मशिदीजवळ बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यात बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. याच प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने समोमवारी एनआए न्यायालयातील सुनावनीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या आरोपींवर मंगळवारी (३० ऑक्टोबर) एनआयए न्यायालयात आरोप निश्चिती केली जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, हा अंदाज खरा ठरला. न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर सर्व आरोपींवरील आरोप निश्चित केले आहेत.
दरम्यान, एनआयए न्यायालयातील सुनावणीला आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्थगिती देणार नाही, असे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्या. अजय गडकरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडणार हे नक्की होते .