Mumbai: मुंबई झोपडपट्टीत 20 वर्षीय महिलेची आत्महत्या, राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
वारंवार फोन करूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर महिला लटकलेल्या अवस्थेत आढळली.
Mumbai: मुंबई झोपडपट्टीत 20 वर्षीय महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला तिच्या राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली. बेहरामबाग झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस. शाहीन परवीन असे पीडित महिलेचे नाव आहे. ही महिला झोपडपट्टीतील एका छोट्या खोलीत एकटीच राहात होती. वारंवार फोन करूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर महिला लटकलेल्या अवस्थेत आढळली.
शेजारी राहणाऱ्या नागरिकांना यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा -Mumbai Fire: अंधेरी भागात D'Souza Compound मध्ये आग; 33 जणांना अग्निशमन दलाने सुरक्षित काढले बाहेर (Watch Video))
प्राप्त माहितीनुसार, ही महिला मूळची बिहारची असून, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीच्या आधारे, अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
25 ऑगस्ट रोजी खारघर येथील तळोजा कारागृहाजवळील एका सीमाशुल्क अधीक्षकाने तलावात उडी मारून आत्महत्या केली होती. हा मृतदेह परिसरातील नागरिकांनी पाहिला. अधिकाऱ्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये सहा जणांची नावे दिली आहेत. जे त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेत. याप्रकरणी खारघर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.