IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख पार; सध्या कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या

मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane) ,नाशिक (Nashik) , औरंगाबाद (Aurangabad) सह कल्याण डोंबिवली (Kalyan-Dombivli) , नवी मुंबई (Navi Mumbai) या मनपा क्षेत्रात सुद्धा किती कोरोना बाधित रुग्ण आहेत जाणून घ्या.

Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत काल सर्वात मोठी विक्रमी वाढ झाली. कालच्या दिवसभरात राज्यात एकूण 9 हजार 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे समजतेय. यावेळेस केवळ मुंबई किंवा पुण्यातच नव्हे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सद्य घडीला मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane) ,नाशिक (Nashik) , औरंगाबाद (Aurangabad) सह कल्याण डोंबिवली (Kalyan-Dombivli) , नवी मुंबई (Navi Mumbai)  या मनपा क्षेत्रात सुद्धा किती कोरोना बाधित रुग्ण आहेत जाणून घेण्यासाठी खाली दिलेला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी दर्शवणारा तक्ता तपासून पहा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1,01,388 5714
2 ठाणे 10,503 212
3 ठाणे मनपा 17,226 623
4 नवी मुंबई मनपा 12,929 348
5 कल्याण डोंबिवली मनपा 18,115 305
6 उल्हासनगर मनपा 5855 96
7 भिवंडी निजामपूर मनपा 3310 226
8 मीरा भाईंदर 7173 226
9 पालघर 2374 27
10 वसई विरार मनपा 9549 219
11 रायगड 6078 110
12 पनवेल मनपा 5335 114
ठाणे मंडळ एकूण 1,99, 835 8220
1 नाशिक 2259 88
2 नाशिक मनपा 6015 194
3 मालेगाव मनपा 1259 85
4 अहमदनगर 855 26
5 अहमदनगर मनपा 597 9
6 धुळे 996 45
7 धुळे मनपा 905 38
8 जळगाव 5489 319
9 जळगाव मनपा 1825 74
10 नंदुरबार 382 17
नाशिक मंडळ एकूण 20,582 895
1 पुणे 5497 142
2 पुणे मनपा 38, 620 1019
3 पिंप्री-चिंचवड मनपा 10,507 198
4 सोलापूर 1748 50
5 सोलापूर मनपा 3867 334
6 सातारा 2351 75
पुणे मंडळ एकुण 62,590 1823
1 कोल्हापूर 1842 27
2 कोल्हापूर मनपा 229 3
3 सांगली 630 17
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 266 10
5 सिंधुदुर्ग 278 5
6 रत्नागिरी 1195 40
कोल्हापूर मंडळ एकुण 4440 104
1 औरंगाबाद 2461 39
2 औरंगाबाद मनप 7317 330
3 जालना 1366 55
4 हिंगोली 402 3
5 परभणी 219 6
6 परभणी मनपा 148 1
औरंगाबाद मंडळ एकूण 11,913 435
1 लातूर 651 36
2 लातूर मनपा 457 16
3 उस्मानाबाद 498 25
4 बीड 335 8
5 नांदेड 345 14
6 नांदेड मनपा 463 20
लातूर मंडळ एकूण 2749 119
1 अकोला 525 27
2 अकोला मनपा 1524 71
3 अमरावती 180 11
4 अमवरावती मनपा 1042 34
5 यवतमाळ 544 17
6 बुलढाणा 493 22
7 वाशीम 336 5
अकोला मंडळ एकूण 4644 184
1 नागपूर 488 4
2 नागपूर मनपा 2054 27
3 वर्धा 71 1
4 भंडारा 187 2
5 गोंदिया 229 3
6 चंद्रपूर 168 0
7 चंद्रपूर मनपा 60 0
8 गडचिरोली 190 1
नागपूर मंडळ एकूण 3447 38
1 इतर राज्य 255 32
एकूण 3,10, 455 11,854

दरम्यान, ही आकडेवारी लक्षात घेता, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आजपासून पुन्हा एकदा लॉक डाऊन लागू करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात सर्व कंटेनमेंट झोन मध्ये 31  जुलै पर्यंत लॉक डाऊन कायम असणार आहे.

दुसरीकडे देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 11 लाखाचा टप्पा पार केलाय. मागील 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी अशी 40 हजार 425 रुग्णांची वाढ झाली आहे. यानुसार देशात सध्या 11,18,043 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे समजतेय.