पालघर: केमिकल कंपनीत स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू
स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात या स्फोटाचा हादरा बसला. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. विजय पांडुरंग सावंत आणि समीर शहाबुद्दीन खोज, अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत.
पालघरमधील (Palghar) बोईसर औद्योगिक कार्यक्षेत्रातील 'गॅलेक्सी सर्फेक्टंट' या कंपनीमध्ये आज दुपारी भीषण स्फोट (Cylinder Blast) झाला. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात या स्फोटाचा हादरा बसला. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. विजय पांडुरंग सावंत आणि समीर शहाबुद्दीन खोज, अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत.
या घटनेची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा - Coronavirus: कोरोनामुळे MPSC-UPSC ची परीक्षा देऊ न शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देणार? - उदय सामंत)
प्राप्त माहितीनुसार, सदर कंपनी सॅनिटायझिंग आणि हात धुण्याचे लिक्विड बनवण्याची कंपनी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात या कंपनीचे काम सुरूचं होते. या कंपनीच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. ही कंपनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सुरू ठेवण्यात आली होती.