Crane Crashes In Kopar Khairane: कोपरखैरणे येथे बांधकाम स्थळावर क्रेन कोसळून 2 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर
सागर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प सुरू असलेल्या नोडच्या सेक्टर 10 मध्ये दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली.
Crane Crashes In Kopar Khairane: नवी मुंबईतील कोपरखैरणे, (Kopar Khairane) सेक्टर 10 येथे गुरुवारी दुपारी एका बांधकामाच्या ठिकाणी क्रेन (Crane) कोसळून तीन कामगार जखमी झाले. त्यापैकी रिजवान अली नावाचा एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. कोपरखैरणे येथील सेक्टर 10 मध्ये एक जुनी इमारत पाडण्यात येत होती. यावेळी ही घटना घडली. कोपरखैरणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास इमारत पाडल्यानंतर क्रेन बसवण्याचे काम सुरू असताना ते कोसळले. जखमींना तातडीने बाहेर काढून वाशी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोन कामगार किरकोळ जखमी झाले, तर एकाला गंभीर दुखापत झाली.
कोपरखैरणे पोलिसांनी सांगितले की, सध्या या घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सागर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प सुरू असलेल्या नोडच्या सेक्टर 10 मध्ये दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. शहरातील मैथिली समूह द ट्रेलीस नावाचा 25 मजली टॉवर बांधत आहे. (हेही वाचा - Thane Affordable Houses: ठाण्यात उपलब्ध होणार मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे; सरकार सुरु करणार गृहनिर्माण प्रकल्प)
क्रेनमधून उडी मारल्याने मुश्ताक किरकोळ जखमी झाला, तर घटनास्थळावरील इतर कामगार क्रेन अपघाताच्या मार्गावरून दूर जाण्यात यशस्वी झाले. कोपर खैरणे अग्निशमन केंद्रातील एस एस गोराड यांनी सांगितले की, आम्हाला रात्री 12.09 वाजता कॉल आला आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत क्रेन चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आम्हाला तेथे कोणीही जखमी झाल्याचे आढळले नाही.
साइट पर्यवेक्षक मनोज नांबियार यांनी सांगितले की, सकाळी 11.45 च्या सुमारास साइटवर कार्यरत असलेली क्रेन अचानक कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या क्रेनमध्ये यांत्रिक बिघाड असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे आम्ही क्रेन कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. संबंधित क्रेन कंपनीचे अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करतील. त्यानंतर अपघाताचे नेमके कारण कळेल, असं नांबियार यांनी नमूद केलं.