Mumbai: मुंबईत झाड कोसळून झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू
चार फूट घेर असलेले 35 फूट उंच वटवृक्ष सार्वजनिक शौचालयावर कोसळून आतमध्ये असलेले कौशल दोशी (38 वर्षे) गंभीर जखमी झाले.
Mumbai: पश्चिम उपनगरात (Western Suburbs) बुधवारी झाड (Tree) कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही दोन्ही झाडे खासगी जागेवर असल्याचा दावा बीएमसीने केला आहे. पहिली घटना पहाटे मणिभाई मुंजी चाळ, मालाड (प.) येथे घडली. चार फूट घेर असलेले 35 फूट उंच वटवृक्ष सार्वजनिक शौचालयावर कोसळून आतमध्ये असलेले कौशल दोशी (38 वर्षे) गंभीर जखमी झाले. स्थानिक रहिवाशांनी त्यांना तातडीने बीएमसीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. परंतु कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मृत घोषित केले.
दुसरी घटना दुपारी 3.38 वाजता दत्त मंदिर, जुनी बीएमसी कॉलनी, गोरेगाव (प.) जवळ घडली. नारळाच्या झाडाचा काही भाग घरावर पडला त्यात प्रेमलाल निर्मल (वय, 30) हा गंभीर जखमी झाला. (हेही वाचा - Maharashtra Weather: आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज)
त्याला तातडीने प्रार्थना हॉस्पिटल, लिंक रोड, गोरेगाव येथे नेण्यात आले. परंतु, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना घडली तेव्हा तो कपडे इस्त्री करत होता, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Rain Updates Maharashtra: मुंबई, ठाण्यात दमदार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी; वाहनचालक, नागरिकांची गैरसोय (Watch Video))
एका रहिवाशाच्या म्हणण्यानुसार, "काँक्रिटीकरण करताना कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही, ज्यामुळे झाडांची मुळे कमकुवत झाली आहेत. हे झाड खाजगी जागेवर असल्याचे निदर्शनास आणून नागरी अधिकारी आपली जबाबदारी झटकून टाकू शकत नाहीत."