Train Derail at Vasai Road: वसई रोड स्टेशन यार्ड येथे रिकाम्या मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत

संध्याकाळी वसई येथे मालवाहू गाडी अनपेक्षितपणे रुळावरून घसरल्याने दिवा-वसई रेल्वे मार्गावरील सेवांवर आणखी परिणाम झाला.

Goods Train | Representational image (Photo Credits: pxhere)

Train Derail at Vasai Road: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड स्टेशन यार्ड येथे रिकाम्या मालगाडीच्या दोन वॅगन्स रुळावरून घसरल्या (Train Derail). त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी एका मार्गावरील काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. ही घटना सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली असून या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा-वसई मार्गावरील काही गाड्या रुळावरून घसरल्याने काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असला, तरी मुख्य मार्ग चालू होता.  शुक्रवारी संध्याकाळी 5.17 वाजता वसई यार्ड येथे रिकाम्या मालगाडीच्या दोन वॅगन रुळावरून घसरल्या. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वरील वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, मेन लाईन क्लिअर आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Yavatmal News: नागपूरकडे जाणारी एसटी बस पेटवली, घटनेत प्रवाशी सुरक्षित)

दरम्यान, पश्चिम रेल्वे (WR) मार्गावरील ब्लॉकच्या पहिल्या दिवशी पूर्वनियोजित ट्रेन रद्द झाल्यामुळे स्थानकांवर मोठी गर्दी झाली. संध्याकाळी वसई येथे मालवाहू गाडी अनपेक्षितपणे रुळावरून घसरल्याने दिवा-वसई रेल्वे मार्गावरील सेवांवर आणखी परिणाम झाला.

गर्दी आणि गोंधळाचा सामना करण्यासाठी, पश्चिम रेल्वे (WR) अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे. बोरिवली, अंधेरी, मालाड आणि इतर अनेक लोकल ट्रेन स्टेशन्सवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कारण, लोकल ट्रेनची वारंवारता पाच मिनिटांच्या पुढे गेली. गाड्यांना उशीर झाल्यामुळे आणि रोखण्यात आल्याने, स्थानकांवर गर्दी वाढली आहे.