1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी टायगर मेमन याचा भाऊ युसूफ मेमन याचा नाशिक कारागृहात मृत्यू
मुंबई पोलीसांनी या आरोप प्रकरणात 4 नोव्हेंबर 1993 मध्ये 10000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात 189 जणांना आरोपी करण्यात आले होते. तेव्हाचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आले होते. दाऊद इब्राहीम याच्यासोबतच टाईगर मेमन, याकूब मेमन, यूसुफ मेमन, मुस्तफा डोसा यांनाही मुख्य आरोपी म्हटले होते.
1993 Mumbai Bomb Blast: मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Bomb Blast) प्रकरणातील आरोपी यूसुफ मेमन (Yousuf Memon) (वय-54) याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नाशिक कारागृहात (Nashik Jail) शिक्षा भोगत असताना हृयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यूसुफ मेमन हा मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमन (Tiger Memon), याकूब मेमन (Yakub Memon) याचा भाऊ होता. यूसुफ याला त्रास होऊ लागल्यानंतर त्याला सिव्हील रुग्णालयात तातडीने हालविण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. युसूफ आणी इसाक हे दोघे भाऊ गेले 2 वर्षे नाशिक कारागृहात शिक्षा भोगत आहेत. हे दोघेही या आधी मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात होते.
मुंबई शहरात 12 मार्च 1993 मध्ये एकूण 12 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 257 लोक मारले गेले होते. तर 713 जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट स्टॉक एक्चेंज, नरसी नाथ स्ट्रीट, शिवसेना भवन, सेच्युरी बाजार, माहीम, झवेरी बाजार, सी रॉक हॉटेल, प्लाजा सिनेमा, जूहू सेंट्रल हॉल, विमानतळ आणि एअरपोर्ट सेंट्रल हॉटेल परिसरात झाले होते. अवघ्या 2 तासांमध्ये एकापाठोपाठ एक अशा झालेल्या एकून 12 बॉम्बस्फोटात 27 कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. (हेही वाचा, 50 हून अधिक दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या जलीस अंसारीला कानपूर येथे अटक; पॅरोलवर बाहेर आल्यावर होता फरार)
मुंबई पोलीसांनी या आरोप प्रकरणात 4 नोव्हेंबर 1993 मध्ये 10000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात 189 जणांना आरोपी करण्यात आले होते. तेव्हाचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणातील अनेक आरोपी आतापर्यंत पकडले गेले आहेत. काहींना सजाही झाली आहे. मात्र, दाऊद इब्राहिम याला पकडण्यात मात्र मुंबई पोलिसांना अद्याप यश आले नाही. दाऊद इब्राहीम याच्यासोबतच टाईगर मेमन, याकूब मेमन, यूसुफ मेमन, मुस्तफा डोसा यांनाही मुख्य आरोपी म्हटले होते. पैकी मुस्तफआ डोसा याचा 2017 मध्ये मुंबई येथील एका रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)