Covid19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरुच; राज्यात दिवसभरात 5 हजार 537 नव्या रुग्णांची नोंद, 198 मृत्यू

तर, 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 80 हजार 298 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 93 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 5 हजार 537 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 80 हजार 298 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 93 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 5 लाख 85 हजार 493 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 17 हजार 400 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 47 हजार 979 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- नाशिक येथे वाढत्या COVID19 च्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना सातच्या आत घरात जाण्याचे आदेश, विनाकारण फिरल्यास कारवाई होणार

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. याचदरम्यान, राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु मृत्यूदर वाढू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत डॉक्टरांसह आयसीयू बेड्सची क्षमता सुद्धा वाढवण्यात येत आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.