नवी मुंबई: महापे येथील मिलेनियम पार्कमधील एकाच आयटी कंपनीत 19 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
हा आकडा खूपच धक्कादायक असून नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 93 वर पोहोचली आहे.
कोरोना व्हायरस चे मुंबईतील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुंबईत 3451 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एक आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील एकाच आयटी कंपनीत 19 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा खूपच धक्कादायक असून नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 93 वर पोहोचली आहे.या आयटी कंपनीतील 50 कर्मचा-यांचे रुटिन चेकअप करण्यात आले. त्यातील 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
अन्य कर्मचा-यांचे रिपोर्ट येणे बाकी असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुंबई: भाटीया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह 6 डॉक्टर Coronavirus संक्रमित
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या 19 कर्मचा-यांपैकी प्रत्येकी 7 मुंबई आणि नव मुंबईचे, प्रत्येकी 2 ठाणे आणि तेलंगाना चे तर 1 कर्मचारी हा सांगलीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्यांना उपचारांसाठी नवी मुंबई मनपा रुग्णालयात दाखल केलं आहे. तर कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 5281 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 251 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर मुंबईत 3451 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता राज्यातील स्थिती खूपच चिंताजनक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.