महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या

त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे, मुंबई सह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत आत दिलेल्या तक्त्यातून जाणून घ्या.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) काल 8 हजार 308 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे, तसेच मृतांचा आजवरचा आकडा 11 हजार 452 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजवर 1 लाख 60 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या राज्यात 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत टॉप ला असणाऱ्या मुंबई शहरात आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे मात्र कल्याण-डोंबिवली , ठाणे, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुंबई सह महाराष्टरातील अन्य जिल्ह्यात किती ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत? किती जणांनी कोरोनावर मात केली आहे तर किती बळी गेलेत याची सविस्तर माहिती खाली दिलेल्या तक्त्यातून जाणून घ्या.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (18  जुलै)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
Mumbai 99,164 5585 69,340
Thane 71,345 1964 31,912
Pune 49,037 1282 18, 172
Palghar 19,290 226 5902
Raigad 10,458 2010 5096
Aurangabad 9195 360 4943
Nashik 8640 353 4895
Jalgaon 6966 381 4203
Solapur 5083 377 2346
Nagpur 2408 24 1417
Akola 1963 96 1588
Satara 2173 75 1176
Dhule 1771 84 1174
Kolhapur 1604 29 890
Jalna 1228 54 639
Ratnagiri 1090 35 669
Ahmadnagar 1198 33 664
Amravati 1074 43 705
Latur 972 42 407
Sangli 813 21 411
Nanded 726 34 382
Yavatmal 492 16 327
Buldhana 473 20 216
Osmanabad 466 23 276
Hingoli 384 3 292
Nandurbar 350 16 172
Sindhudurg 269 5 226
Beed 307 8 134
Gondia 224 3 184
Parbhani 301 7 132
Washim 2301 5 116
Chandrapur 201 0 116
Bhandara 176 2 98
Gadchiroli 171 1 104
Wardha 50 1 33
Other States 226 32 0
Total 2,92,589 11,452 1,60, 357

दरम्यान, भारतात आता कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखाचा टप्पा पार केला आहे. मात्र मूळ आकडेवारी पाहता, कोरोना ऍक्टिव्ह प्रकारणांपेक्षा रिकव्हर झालेल्यांची संख्या अधिक आहेत. रिकव्हरी रेट सध्या 63.25 इतका असून मृत्यूदर (Fatality Rate) 2.57% इतका आहे.