Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे थैमान; राज्यात आज 8 हजार 240 रुग्णांची नोंद, 176 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 8 हजार 240 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 176 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 18 हजार 695 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 75 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे थैमान; राज्यात आज 8 हजार 240 रुग्णांची नोंद, 176 जणांचा मृत्यू
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 8 हजार 240 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 176 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 18 हजार 695 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 75 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 31 हजार 334 जणांवर उपचार सुरु आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 10 लाख 77 हजार 618 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 26 हजार 816 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 लाख 74 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- COVID19 Cases in Dharavi Today: मुंबई येथील धारावी परिसरात आणखी 12 कोरोबाधितांची नोंद; आतापर्यंत 2 हजार 492 जणांना संसर्ग

एएनआयचे ट्वीट-

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातला दर 55 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2020 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).