Thane: 16 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, शाळेतील संचालकास अटक
आत्महत्या करण्याचे नेमके कारण समोर येताच, शाळेतील संचालकाला अटक करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली.
Thane: ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समोर येताच, शाळेतील संचालकाला अटक करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली. मुलाच्या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- पूजा खेडकर यांची आई Manoram Khedkar, वडील Dilip Khedkar सह 5 जणांविरोधात Pune Rural Police मध्ये FIR दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, अनिश दळवी असं विद्यार्थ्यांचे नाव आहे.तर अॅंथनी असे अटक करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. अनिश निंबवली गावातील रहिवासी आहे. त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अनिश हा वरप येथील सेक्रेड हार्ट स्कूल मधील विद्यार्थी होता. तो अकरावीचे शिक्षण घेत होता.
नेमकं प्रकरण काय?
अनिशने आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर एका विद्यार्थींसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केलं होते. ही गोष्टी संचालयाच्या कानावर पडली. संचालकाने अनिशसोबत मित्रांना बोलावून घेतले आणि तिघांनाही बेदम मारहाण केली. त्यांना शाळेतून काढून टाकण्यात येईल अशी ताकीत देत त्यांना घरी पाठवले. बुधवारी अनिश शाळेतून घरी लवकर आला. त्यानंतर या गोष्टीची भीती मनात फिरू लागली. या घटनेनंतर त्यांने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
पालकांना या घटनेनंतर मोठा धक्का बसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य घेत चौकशी केली. शाळेतील संचालक अॅंथनी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आले.