महाराष्ट्रात नव्या 16 कोरोना बाधितांसह राज्यात COVID-19 रुग्णांची संख्या 1380 वर
ही संख्या खूपच धक्कादायक असून दिवसेंदिवस महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे.
देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून महाराष्ट्रातील स्थिती काही वेगळी नाही. महाराष्ट्रात नवे 16 कोरोना रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या 1386 वर पोहोचली आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून दिवसेंदिवस महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. आज मुंबईच्या दादर भागामध्ये 3 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. दादरच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये 2 नर्स आणि केळकर मार्गावरील परिसरात 1 पुरूष कोरोनाबाधित म्हणून आढळला आहे.
या सोबत कंटेनेमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या मुंबईतील धारावी परिसरात 5 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावी परिसरातील कोरोना बाधितांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
हेदेखील वाचा- मुंबई: धारावी परिसरात 5 नव्या COVID-19 बाधितांसह या परिसरातील रुग्णांची एकूण संख्या 22 वर
पाहा ट्विट:
भारतात 547 नव्या रुग्णांसह आज कोरोना बाधितांची एकूण संख्या 6412 इतकी झाली आहे. यात गेल्या 12 तासांमध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असल्याचे आरोग्य मंत्रलायाकडून सांगण्यात येत आहे. भारतातील 6412 रुग्णांपैकी 5706 रुग्णांवर उपचार सुरु असून 504 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.