Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा

मुंबई सह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकूण किती रुग्ण आहेत? किती मृत्यू झाले आहेत आणि कितींनी कोरोनावर मात केली आहे याची सविस्तर माहिती जाणून घ्या..

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात तासात कोरोना व्हायरसची एकूण 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 10 हजार 744 वर पोहचली आहे. यापैकी 4 हजार 128 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 56 हजार 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत (Coronavirus In Mumbai) सुद्धा काल कोरोनाचे नवे 1066 रुग्ण आणि 58 मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता 59201 झाली आहे. यामध्ये 30125 बरे झालेले रुग्ण, 26828 सक्रीय रुग्ण आणि 2248 मृत्यूंचा समावेश आहे. मुंबई सह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकूण किती रुग्ण आहेत? किती मृत्यू झाले आहेत आणि कितींनी कोरोनावर मात केली आहे याची सविस्तर माहिती जाणून घ्या..

दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात 5 हजार 71 रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशातील कोरोनाचे अपडेट जाणून घ्या एका क्लिक वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंंबई 59293 2250 30125
ठाणे 18732 480 7890
पुणे 12419 494 7279
औरंगाबाद 2786 135 1516
पालघर 2476 71 714
नाशिक 2006 104 1214
रायगड 1932 72 1247
सोलापुर 1889 133 690
जळगाव 1783 135 730
नागपुर 1046 12 624
अकोला 1026 42 568
सातारा 752 28 461
कोल्हापुर 729 8 532
रत्नागिरी 435 17 290
धुळे 433 39 223
अमरावती 351 21 258
जालना 280 8 171
अहमदनगर 246 9 166
सांगली 246 7 125
हिंगोली 242 1 187
नांदेड 241 10 161
यवतमाळ 190 3 137
लातुर 181 8 121
सिंधुदुर्ग 156 0 83
उस्मानाबाद  150 5 113
बुलडाणा 125 3 77
परभणी 82 3 71
बीड 75 2 49
गोंदिया 71 0 69
नंंदुरबार 66 4 32
वाशिम 53 2 8
भंंडारा  50 0 41
चंद्रपुर 50 0 28
गडचिरोली 49 1 41
वर्धा 14 1 8
अन्य जिल्हे 89 20 0
एकुण 110744 4128 56049

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात कोरोनाची 10,667 नवीन प्रकरणे आणि 380 मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण सकारात्मक घटनांची संख्या आता 343091 इतकी आहे. यामध्ये 1,53,178 सक्रिय प्रकरणे, 1,80,013 बरे झालेले रुग्ण आणि 9,900 मृत्यू नोंदवले आहेत.