Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई येथे बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) धोका असल्याने आता महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) धोका असल्याने आता महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. ज्या बोटी अद्याप देखील समुद्रात आहेत त्यांना माघारी किनाऱ्यावर बोलवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) एनडीआरएफच्या (National Disaster Response Force) 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भावासोबतच महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर निसर्ग चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 3 जून म्हणजे उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत -3, राजगड- 4, पालघर- 2, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबईत प्रत्येकी एक अशा संपूर्ण महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री सहित येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे. दरम्यान, 3 तारखेला या महाराष्ट्र किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. हे देखील वाचा- Nisarga Cyclone: चक्रीवादळात नागरिकांनी काय विशेष काळजी घ्यावी, वाचा सविस्तर
एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान सांगण्यात आले आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून त्यामुले खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किनाऱ्याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.