Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स

काल दिवसभरात 13,408 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे

Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोविड-19 (COVID-19) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि कोविड योद्धा अहोरात्र झटत आहेत. राज्यात काल (12 ऑगस्ट) दिवसभरात 12,712 रुग्णांची वाढ झाली असून 344 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5,48,313 वर पोहोचली असून मृतांची संख्या 18,650 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 13,408 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 3,81,843 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 1,47,513 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे हण्याचे प्रमाण 69.64% इतके आहे. तर मृत्यूदर 3.4% इतका आहे. राज्यात आतापर्यंत 29,08,887 कोविड-19 च्या चाचण्यांपैकी 5,48,313 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सद्य घडीला 10,15,115 कोरोनाचे रुग्ण होम क्वारंटाईन असून 35,880 रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,132 रुग्णांची नोंद; शहरामध्ये बरे झालेल्या रुग्णांनी ओलांडला 1 लाखाचा टप्पा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (12 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई

126356

6943

100069
ठाणे

108399

3125

85427
पुणे

119628

2865

76925
पालघर

19512

454

13491
औरंगाबाद

17219

556

11437
रायगड

21307

539

16641
नाशिक

22577

616

14340
जळगाव

15780

639

10719
सोलापूर

12836

605

7401
नागपूर

10608

292

3758
अकोला

3103

132

2487
सातारा

6229

186

4001
धूळे

4363

133

2971
कोल्हापूर

11176

276

5289
जालना

2772

100

1721
रत्नागिरी

2388

90

1510
अमरावती

3126

90

2052
अहमदनगर

11033

115

7000
सांगली

5198

159

2623
लातुर

4407

169

1893
नांदेड

3469

125

1505
यवतमाळ

1754

46

1149
बुलडाणा

2065

55

1228
हिंगोली

862

19

555
उस्मानाबाद

2858

73

1279
सिंधुदुर्ग

534

9

376
नंदुरबार

1000

50

595
गोंदिया

681

6

384
बीड

2233

41

628
अन्य जिल्हे

565

58

0
परभणी

1228

47

493
वाशिम

1013

19

667
चंद्रपूर

843

3

422
भंडारा

431

3

259
गडचिरोली

456

2

341
वर्धा

304

10

207
एकुण

548313

18650

381843

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून काल कोरोना विषाणूच्या 1,132 रुग्णांची व 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,26,371 वर पोहोचली आहे. 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.81 टक्के आहे. 11 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 6,22,963 इतक्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 86 दिवस झाला आहे.