Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज 12,614 नवे कोरोना संक्रमित रुग्ण, तर 322 जणांचा मृत्यू
तर दिवसभरात 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 84 हजार 754 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 1 लाख 56 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 08 हजार 286 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (Public Health Department) माहिती दिली आहे.
Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज राज्यात 12, 614 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 84 हजार 754 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 1 लाख 56 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 08 हजार 286 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (Public Health Department) माहिती दिली आहे. याशिवाय आज 6 हजार 844 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. दुर्देवाची बाब म्हणजे आतापर्यंत राज्यातील 19 हजार 749 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - कोरोना सोबत जगताना शेतकरी, शेतमजूर कामगारांच्या हिताना सर्वोच्च प्राधान्य देणार - विजय वडेट्टीवार)
आज राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.82 टक्के आहे. तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा दर 3.38 टक्के इतका आहे. याशिवाय राज्यात सध्या 10 लाखाहून अधिक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच 37 हजार पेक्षा जास्त जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
राज्यात मुंबई शहर, ठाणे, पालघर, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या शहरी भागाप्रमाणेचं ग्रामीण भागांमध्येदेखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.