पुणे (Pune) येथे आज आणखी 1 हजार 255 नव्या कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 83 हजार 395 वर पोहचली आहे. तसेच आज 1 हजार 243 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या 66 हजार 589 वर पोहचली आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले होते. सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. परंतु, पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागल्याने प्रशासनाचे दाबे दणाणले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2711 वर पोहचला, महापालिकेची माहिती
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाउन उघडणार की आणखी वाढवला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.