Mumbai Water Cut: महावितरणच्या कामांसाठी 9 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत 12 तास पाणीपुरवठा बंद
त्यामुळे बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही.
Mumbai Water Cut: खारघर (Kharghar) आणि कामोठे (Kamothe) सह नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) क्षेत्रात 9 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. NMMC ने जाहीर केल्यानुसार महावितरणच्या विद्युत पुरवठ्याचे काम सुलभ करण्यासाठी हा 12 तासांचा शटडाऊन आवश्यक आहे.
NMMC च्या पाणी पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात शटडाऊन होणार आहे. त्यामुळे बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही. या बंदचा प्रभाव कामोठे आणि खारघर नोडसह सिडको प्रशासित भागांनाही बसणार आहे. या काळात रहिवाशांना पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा -Dengue Outbreak In Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा फैला, 15 दिवस शाळांना सुट्टी)
याशिवाय, महाराष्ट्र जल प्राधिकरण (MJP) ने 9 ऑक्टोबर (सोमवार) सकाळी 9 वाजल्यापासून 10 ऑक्टोबर (मंगळवार) पर्यंत विविध देखभाल कामांसाठी शटडाऊन ठेवला आहे. त्यामुळे या कालावधीत कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे, काळुंद्रे नोडमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी नवी मुंबईतील सर्व नोड्समध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणे अपेक्षित आहे. NMMC आणि सिडको या दोघांनीही रहिवाशांना या कालावधीत पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.