Coronavirus In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; राज्यात आज 11 हजार 119 रुग्णांची नोंद, 422 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणखी 11 हजार 119 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 422 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 15 हजार 477 वर पोहचली आहे. यापैंकी 20 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; राज्यात आज 11 हजार 119 रुग्णांची नोंद, 422 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणखी 11 हजार 119 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 422 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 15 हजार 477 वर पोहचली आहे. यापैंकी 20 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Dharavi: मुंबईतील धारावीत आढळले फक्त 4 कोरोनाबाधित रुग्ण, महापालिकेची माहिती

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातील दरामध्ये आणखी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज नवीन 9 हजार 356 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 37 हजार 870 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2020 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).