महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्रास न देता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार: आशिष शेलार यांची विधीमंडळात माहिती
दरम्यान महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्रास न देता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं सांगितले आहे.
अंतर्गत मार्कांच्या गोंधळामुळे सध्या दहावीचे निकाल लागूनही अकरावीची प्रवेशप्रक्रिया सध्या रखडली आहे. आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये शालेय मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माहिती देताना उद्या (19 जून) पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याचे आश्वासन सभागृहामध्ये दिले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्रास न देता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं सांगितले आहे. महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल 77.10%; यंदाही मुलींची बाजी
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये अंतर्गत गुण समाविष्ट केलेले नाहीत. परिणामी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत दहावीच्या इतर बोर्डाच्या म्हणजे ICSE, CBSE, IB बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण अंतर्गत गुण असल्याने अधिक मिळाले आहेत. त्यामुळे प्रवेश घेताना समान पातळीवर तुलना व्हावी अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे.
काही दिवसांपूर्वी केवळ यंदाच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान विशेष तुकडी सुरू करावी अशी मागणी युवासेनेकडून आदित्य ठाकरेंनी केली आहे. तर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाशी बोलून इतर बोर्डचे केवळ लेखी गुण समाविष्ट केले जावेत अशी विनंती विनोद तावडे करणार आहेत. असी माहितीदेखील देण्यात आली होती. मात्र आता नेमक्या कोणत्या पद्धतीनुसार अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू होईल याची माहिती लवकरच दिली जाईल.