100 Years Of Nair Hospital: मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या शतक महोत्सव समारंभात CM Uddhav Thackeray कडून रूग्णालयाला 100 कोटींची घोषणा
असे उद्गार काढले जातील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबई मधील नायर हॉस्पिटल (Nair Hospital) आज (4 सप्टेंबर) आज 100 वर्ष पूर्ण करत आहे. या शतकवर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरोग्य कर्मचार्यांचे आभार मानत नायर हॉस्पिटलसाठी 100 कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. कोरोना संकट काळात देऊळबंद असताना देव कुठे आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आला पण देव डॉक्टरांच्या रूपात आपल्या पाठीशी होता असं सांगत उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्यांनी दिवसरात्र केलेल्या कामामुळे आपण आता चांगले दिवस बघू शकत आहोत असं म्हणत आरोग्यकर्मचार्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
भारत स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 25 वर्ष सुरू झालेलं नायर हॉस्पिटल आजही जनसेवेत आहे. या संस्थेचा प्रवास थक्क करणारा आहे असे देखील गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. जिद्दीच्या बळावर काय केले जाऊ शकतं याची प्रचिती या संस्थेकडे पाहून येते. सध्या हॉस्पिटलं मंदिरांच्या जागी आहे. अनेक दुर्धर आजारांवर मात करण्यासाठी रूग्ण इथे येतात आणि बरे होऊन जातात. त्यांच्यासाठी काम करणार्या तुम्हा सार्यांचे आभार मानतो असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण
100 वर्षांपूर्वी जमीन देण्यापासून, घेण्यापासून, इमारत उभी करण्या पर्यंत आणि आज देखील कोण कुठून, कुणाचा संबंध असेल किंवा नसेल पण दानशूर व्यक्ती दान देत आहेत. म्हणून रूग्णसेवा शक्य आहे. अशात राज्य सरकार म्हणून, महापालिका म्हणून आमचं कर्तव्य तर आहे त्यातून 100 कोटी मंजूर करत आहे . पण 100 वर्षानिमित्त असं काही तरी काम करुन दाखवा की पुढील 100 वर्षानंतर म्हटलं गेलं पाहिजे की त्यावेळी केलेलं काम आजही उपयोगी पडत आहे.