Crime News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग, दुर्घटनेत महिलेच्या १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यू तर पिडीत गंभीर जखमी
मुंबई अहमदाबाद प्रवासादरम्यान पालघर जवळ चालक विजय कुशवाह याने चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब पुढे आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद प्रवासादरम्यान पालघर जवळ चालक विजय कुशवाह याने चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब पुढे आहे. तरी या दुर्घटनेत महिलेच्या १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला असुन महिला गंभीर जखमी आहे. उपचारासाठी पिडीतेस रुग्णालयात दाकल करण्यात आले आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी विजय कुशवाहला अटक केली असुन या प्रकरणातील उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. पिडीतेवर अत्याचार केल्यानंतर तिला कार मधून ठकलून दिल्याची माहिती मिळत आहे. या कुकर्मात फक्त टॅक्सी चालक नाही तर सहप्रवाशांनी देखील महिलावर त्याचा केले असुन सामुहिक बलात्काराची धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
महिलेने अत्याचार होत असताना तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या केवळ १० महिन्यांच्या चिमुरडीला भरधाव कारमधून फेकून दिलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. महिलेवर अत्याचार केल्यानंतर महिलेस देखील कारमधून रस्त्याच्या कडाला फेकून दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. प्रकरणी नराधमांवर 304 आणि 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (हे ही वाचा:- Gurugram Crime: वेब सीरिजच्या कथेवरून रचला डाव, आईच्या उपचारासाठी कंपनीच्या एचआरला दिली जीवे मारण्याची धमकी, 12 लाखांची केली मागणी, तरुण अटकेत)
पोलिस संबंधीत प्रकरणाचा कसुन तपास करीत आहे. रहदारीच्या रस्त्यावरील चालत्या कारमधील घटना बघता महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे. तरी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असुन लवकर लवकरचं सगळे आरोपी गजाड असतील असे पोलिसांचे प्रयत्न आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)