मुंबई-अहमदाबाद महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद प्रवासादरम्यान पालघर जवळ चालक विजय कुशवाह याने चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब पुढे आहे. तरी या दुर्घटनेत महिलेच्या १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला असुन महिला गंभीर जखमी आहे. उपचारासाठी पिडीतेस रुग्णालयात दाकल करण्यात आले आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी विजय कुशवाहला अटक केली असुन या प्रकरणातील उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. पिडीतेवर अत्याचार केल्यानंतर तिला कार मधून ठकलून दिल्याची माहिती मिळत आहे. या कुकर्मात फक्त टॅक्सी चालक नाही तर सहप्रवाशांनी देखील महिलावर त्याचा केले असुन सामुहिक बलात्काराची धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
महिलेने अत्याचार होत असताना तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या केवळ १० महिन्यांच्या चिमुरडीला भरधाव कारमधून फेकून दिलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. महिलेवर अत्याचार केल्यानंतर महिलेस देखील कारमधून रस्त्याच्या कडाला फेकून दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. प्रकरणी नराधमांवर 304 आणि 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (हे ही वाचा:- Gurugram Crime: वेब सीरिजच्या कथेवरून रचला डाव, आईच्या उपचारासाठी कंपनीच्या एचआरला दिली जीवे मारण्याची धमकी, 12 लाखांची केली मागणी, तरुण अटकेत)
Maharashtra |Case registered u/s 304&354 IPC in PS Mandvi, Palghar dist against one Vijay Kushwaha for allegedly molesting a woman in a moving car on Mumbai-Ahmedabad highway. In the incident, the woman's 10-mnth-old child died.She's currently under treatment at a hospital:Police
— ANI (@ANI) December 11, 2022
Maharashtra | Palghar district's PS Mandvi has arrested Vijay Kushwaha, the driver accused of molesting a woman in a moving car. Search is underway to find the rest of the accused in this case.
— ANI (@ANI) December 12, 2022
पोलिस संबंधीत प्रकरणाचा कसुन तपास करीत आहे. रहदारीच्या रस्त्यावरील चालत्या कारमधील घटना बघता महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे. तरी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असुन लवकर लवकरचं सगळे आरोपी गजाड असतील असे पोलिसांचे प्रयत्न आहेत.