वेळ आली होती, काळ आला नव्हता, चौथ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला सुरक्षित

गुरुवारी (3 जानेवारी) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास तो घराच्या गॅलरीत खेळत होता. खेळता खेळता अचानक तो खिडकीतून खाली कोसळला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातले आणि शेजारचे लोक बाहेर आले असता तो खिडकीतून खाली पडल्याचे समजले. त्यांनतर एकच खळबळ उडाली.

Barkade family | (Archived images)

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्यावर एखादा व्यक्ती जिवंत राहणे हे कठीणच. या आधी अशा प्रकारे घडलेल्या अपघातांच्या घटना पाहता त्यातील बहुतांश लोकांचे प्राण गेले आहेत किंवा पीडितांना मोठ्या जखमा आणि अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. पण, मुंबई (Mumbai) येथील देवनार (Deonar) परिसरात अशाच एका घटनेत एका चिमूकल्याला केवळ खरचटण्यापलीकडे काहीच झाले नाही. अथर्व बरकडे (Atharva Barkade ) हा केवळ १५ महिन्यांचा चिमूकला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन जमीनवर पडला. पण, इमारतीच्या बाजूला असलेल्या झांडांच्या फांद्यामध्ये तो अडकत राहिला. त्यामुळे खाली पडण्याचा वेग कमी होऊन तो आश्चर्यकारकरित्या सुखरुप वाचला. त्याला सुखरुप पाहून त्याच्या आईबाबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या घटनेनंतर अथर्वची वेळ आली होती पण, काळ आला नव्हता अशीच चर्चा परिसरात सुरु झाली.

प्राप्त माहितीनुसार, अथर्व हा त्याच्या आईबाबांसोबत देवनार येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये राहतो. गुरुवारी (3 जानेवारी) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास तो घराच्या गॅलरीत खेळत होता. खेळता खेळता अचानक तो खिडकीतून खाली कोसळला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातले आणि शेजारचे लोक बाहेर आले असता तो खिडकीतून खाली पडल्याचे समजले. त्यांनतर एकच खळबळ उडाली. (हेही वाचा, अन आईसमोर 130 फूट उंचावर आकाशात लटकत होता 5 वर्षांचा चिमुकला)

दरम्यान, अथर्व चौथ्या मजल्यावरुन खाली पडला हे समजताच आता सर्व संपले असेच काहीसे प्रत्यक्षदर्शींना वाटले. पण, त्याचे दैव बलवत्तर होते. चौथ्या मजल्यावरुन पडूनही त्याला केवळ खरचटण्यापलीकडे काहीच झाले नाही. घटना तर घडून गेली पण त्याच्या शरीराला एखादी अंतर्गत जखम तर झाली नाही ना? हे तपासण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सुरक्षित अससल्याचे त्याच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून अद्यापही त्याला डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली रुग्णालयातच ठेवण्यात आल्याची माहिती आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif