Fraud Case In Nagpur: वीज बिलाच्या बनावट मेसेजच्या लिंकवर क्लिक करताच खात्यातून कट झाले 1 लाख 68 हजार रुपये

पीडित व्यक्तीने लिंकवर क्लिक करताच त्याच्या खात्यातून पैसे कापले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Online Fraud | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

Fraud Case In Nagpur: नागपूर ((Nagpur) शहरात एका व्यक्तीची ऑनलाइन माध्यमातून 1 लाख 68 रुपयांची फसवणूक (Online Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित व्यक्तीने लिंकवर क्लिक करताच त्याच्या खात्यातून पैसे कापले गेल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एका सरकारी कोळसा कंपनीच्या कर्मचाऱ्याला वीजबिलाबाबत बनावट संदेश आला होता, त्यानंतर त्याची 1.68 लाख रुपयांची फसवणूक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार अवधिया असे या 46 वर्षीय व्यक्तीचे नाव असून, त्याच्या मोबाईलवर 29 ऑगस्ट रोजी पैसे न भरल्याने त्याचे वीज कनेक्शन तोडले जाईल, असा संदेश आला. या मेसेजमध्ये एका अॅप्लिकेशनची लिंकही शेअर करण्यात आली होती. (हेही वाचा - Farmers Suicide: मराठवाड्यात 237 दिवसांत 626 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे)

राजेशकुमारने पोलिसांना सांगितले की, त्याने त्या लिंकवर क्लिक करताच त्याच्या खात्यातून 1.68 लाख रुपये काढण्यात आले. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार फसवणूक आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूरमध्ये ऑनलाइन फसवणुकीची मोठी घटना समोर आली आहे. याठिकाणी मोबाईलवरील अज्ञात लिंकवर क्लिक केल्यानंतर काही वेळातच एका विद्यार्थ्याच्या खात्यातून 20 लाख रुपये लंपास करण्यात आले. पीडित विद्यार्थी रोहितकुमार पटेल याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, त्याच्या व्हॉट्सअॅपवर एका नंबरवरून एक मेसेज आला होता. ज्यावर एक लिंक देण्यात आली होती, त्यानंतर त्याच्या खात्यातून रक्कम कापल्याचा मेसेज आला होता.