Nagpur: 'जे कोलकत्ता मध्ये घडलं ते तुझ्या सोबत करीन', रिक्षा चालकाची दोन शाळकरी मुलींना धमकी, नागरिकांनी धु धु धुतलं (Watch Video)

हे प्रकरण शांत झालेलं नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा समोर आले. नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Nagpur Riksha driver Threaten Photo credit Twitter

Nagpur: कोलकता डॉक्टर हत्या आणि बलात्कार प्रकरणामुळे संपुर्ण देशभरात आंदोलन सुरु आहे. हे प्रकरण शांत झालेलं नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा समोर आले. नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन शाळकरी मुलींना रिक्षा चालकाने धमकी दिल्याचे समोर आले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलींनी आरडाओरड केला. ज्यामुळे स्थानिकांनी चालकाला बेदम  मारहाण केली. (हेही वाचा- अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात दाखवला अश्लिल व्हिडिओ, पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्ता येथील महिला डॉक्टरांसोबत जे घडले तेच तुमच्या सोबत करीन अशी धमकी एका रिक्षा चालकाने दोन शाळकरी मुलींना दिली. त्यानंतर मुलींनी आरडाओरड करत रिक्षा थांबवून घेतली. मुलींनी आरडाओरड करत स्थानिकांना बोलावून घेतले. त्यानंतर स्थानिक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर स्थानिकांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. पीडित तरुणींनी देखील चालकाला चापट मारली.

ही घटना नागपूर शहरातील आहे. पार्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणी माहिती देण्यात आली. मंगळावरी दुपारी घडलेली ही घटना शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली.पोलिस या प्रकरणी रिक्षा चालकावर कारवाई करत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.