इंफेक्शनसारख्या गोष्टींपासून वाचण्यासाठी अशी घ्या प्रायव्हेट पार्ट्सची काळजी
डॉक्टर, पुरुष आणि स्त्री अशा दोहोंच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या टिप्स देतात, मात्र या पार्ट्सच्या स्वच्छतेसाठी अशा काही कॉमन गोष्टी आहेत ज्या पुरुष आणि स्त्री अशा दोहोंसाठी लागू होतात
सध्याच्या काळात आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या सफाईकडे विशेष लक्ष देतो. सुर्यप्रकाशाच्या नजरेच्या टप्प्यात येणारे अवयव तर विशेष महत्वाचे असतात. चेहऱ्यासाठी क्रीम्स, हातापायासाठी लोशन अशा अनेक गोष्टींचा वापर होत मात्र तितकेच लक्ष आपण कपड्यांनी झाकलेल्या अवयवांकडे देतो? पुरुष असो वा स्त्री प्रत्येकासाठीच प्रायव्हेट पार्टसची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. प्रायव्हेट पार्टस आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्या समाजात टॅबू मानल्या आहेत. मात्र आपणही असाच विचार केला आणि या इतक्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर इन्फेक्शन, जळजळणे, खाज अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच प्रायव्हेट पार्टसची स्वच्छतादेखील तितकीच महत्वाची आहे जितके बाकीच्या अवयवांची आहे. डॉक्टर, पुरुष आणि स्त्री अशा दोहोंच्या प्रायव्हेट पार्टसच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या टिप्स देतात, मात्र या पार्टसच्या स्वच्छतेसाठी अशा काही कॉमन गोष्टी आहेत ज्या पुरुष आणि स्त्री अशा दोहोंसाठी लागू होतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत या गोष्टी.
> सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेहमी स्वच्छ अंडरगारमेंट वापरले पाहिजेत. कधीही ओलसर अंडरवेअर वापरू नका. तसेच अंडरगारमेंट्स रोज बदलत चला.
> अंडरगारमेंट्स धुतल्यानंतर ते नेहमी उन्हातच सुकवा, यामुळे त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
> महिलांसाठी पिरियड्सच्या वेळी दर चार तासांनी पॅड/नॅपकिन बदलने गरजेचे आहे.
> महिलांनी बाथरूमचा वापर केल्यानंतर आपल्या प्रायव्हेट पार्टला टिश्यू पेपरने स्वच्छ करावे.
> वेळोवेळी आपल्या प्रायव्हेट पार्टसच्या आजूबाजूचे केस कापणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेला खाज सुटत नाही. केस कापल्यानंतर त्वचेवर मॉइस्चराइजर लावणे गरजेचे आहे.
> हेयर रिमूव्हिंग क्रीमचा उपयोग जसा सांगितला आहे तसाच करा, अनेक क्रीम्स तुम्ही प्रायव्हेट पार्ट्सवर लावू शकत नाही
> प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेसाठी शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा, यामुळे इन्फेक्शन होत नाही.
> घामामुळे प्रायव्हेट पार्ट्समधून दुर्घांधी येत असेल तर परफ्युमचा वापर करू नका.
> प्रायव्हेट पार्ट्ससाठी शक्यतो माईल्ड साबण वापरावा.
> प्रायव्हेट पार्ट्सच्या जागी खाज सुटली असेल तर जास्त खंजवू नये, त्याऐवजी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.