World Vada Pav Day: मुंबई मधील या '7' वडापावची चव नक्की चाखाच!

चला तर मग आज या जागतिक वडापाव दिनी मुंबईतील पाच हटके आणि चविष्ट वडाप विकणाऱ्या ठिकाणांवर एक नजर टाकुयात

World Vada Pav Day 2019 (Photo Credits: FIle Image)

World Vadapav Day:  मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन गोष्टी म्हणजे लोकल ट्रेन आणि वडापाव! घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकराला कधी एका ठिकाणी निवांत बसून खाण्याचा सुद्धा वेळ नसतो, मात्र अशा वेळी वडापाव हा चाकरमानी उपाशी राहू नये याची खबरदारी पुरेपूर खबरदारी घेतो.गरीब श्रीमंत, लहान- मोठा असा कोणताच भेद न करता गल्लीच्या कोपऱ्यापासून ते पार फॅन्सी हॉटेल मध्ये सुद्धा तुम्हाला वडापाव सहज पाहायला मिळतो. लुसलुशीत पावात तिखट गोड चटणी आणि कुरकुरीत तळलेला गरम वडा म्हणजे एखाद्या खवय्यासाठी पर्वणीच, या अस्सल देशी फास्ट फूडचा सेलिब्रेशन करण्यासाठी आज 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस (World Vadapav Day)  म्ह्णून साजरा केला जातो.

या वडापावचा इतिहास पाहिल्यास, शिवसेनेने सुरु केलेल्या बजाव पुंगी, हटाव लुंगी आंदोलनात 1966 मध्ये दादर येथून, वडापावची सुरूवात झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मुंबईतील तरुणाला व्यवसाय उपलब्ध करून देत ठिकठिकाणी वडापावचे स्टॉल उघडले. कालानुरूप या पारंपरिक पदार्थात ट्विस्ट अँड टर्न्स आणून विकले जाऊ लागले आहेत, चला तर मग आज या जागतिक वडापाव दिनी मुंबईतील पाच हटके आणि चविष्ट वडाप विकणाऱ्या ठिकाणांवर एक नजर टाकुयात..

किर्तीचा वडापाव

किर्ती कॉलेज जवळ अशोक वडापाव म्ह्णून एक छोटेखानी स्टॉल मध्ये मिळणारा वडापाव प्रत्येक खवय्याने चाखायलाच हवा. याठिकाणचा वडापाव हा भजीचा चुरा घालून दिला जातो.

ठिकाण: कीर्ती कॉलेज, दादर

किंमत: 20 रुपये

आनंद वडापाव

मुंबईतील बेस्ट वडापावचा 'किताब सर्वाधिक वेळा मिळवलेले ठिकाण म्हणजे मिठीबाई कॉलेजच्या समोर असलेला आंनद स्टॉल. पावाला बटर आणि एक खास प्रकारची सुकी चटणी लावून मिळणारा वडापाव हे इथले वैशिष्ट्य आहे. याशिवाय मेयॉनीज, चीज वडापाव देखील आवर्जून ट्राय करण्यासारखा आहे. ग्रील वडापाव ही याठिकाणाची खासियत म्हणता येईल.

ठिकाण: मिठीबाई कॉलेज समोर, विलेपार्ले

किंमत: 25 रुपयांपासून

भाऊ वडापाव

भांडुप मधील सर्वात फेमस वडापाव म्हणजे भाऊ वडापाव, सर्वसामान्य वडापावापेक्षा आकाराने किंचित मोठा असल्याने केले वडापावातच तुमचे पोट भरून जाते. अलीकडेच मुलुंड मध्ये सुद्धा याची एक शाखा सुरु झाली आहे.

ठिकाण: वाल्मिकी नगर, भांडुप, एन. एस रोड, मुलुंड (पश्चिम)

किंमत: 20  रुपये

पार्लेश्वर वडापाव सम्राट

विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या अगदी बाहेर लागूनच असलेल्या या स्टॉलमध्ये तुम्हाला वडापवाचे अनेक प्रकार चाखायला मिळतील. इथला चीज आणि बटर वडापाव प्रसिद्ध आहे.

ठिकाण: नेहरू रोड विलेपार्ले सह मुंबईत अनेक ठिकाणी शाखा

किंमत: 20 रुपये

आराम वडापाव

1939 साली सीएसटी येथील आराम हॉटेलच्या बाजूला वडापावचा स्टॉल सुरू केला आणि आता हा खवय्यांना नेहमीच सर्वाधिक आकर्षित करतो.येथील चिंचा आणि खजूराचा गोड चटणी विशेष प्रसिद्ध आहे.

ठिकाण: कॅपिटल सिनेमा, सीएसटी

किंमत: 20 रुपये

गजानन वडापाव

ठाणे, कल्याण परिसरातील सर्वात प्रसिद्ध वडापाव म्हणजे गजाननचा वडापाव.खरंतर या ठिकाणी वड्यापेक्षा सुद्धा चटणी विशेष लक्षवेधी आहे. वडापावसोबत मिळणारी बेसनची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खाऊन तुम्हाला तृप्ती म्हणजे काय हे नक्की कळेल.

ठिकाण: छत्रपती संभाजी रोड, नौपाडा, ठाणे, डोंबिवली स्थानकाच्या बाहेर

किंमत: 15 रुपये

मसाला वडापाव, मुलुंड

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह जवळ एका छोट्या स्टॉल वर मसाला वडापाव ही हटके रेसिपी गेली कित्येक वर्षे विकली जात आहे. कांडा, टोमॅटो आणि मसाले एकत्र करून बनणारा मसाला पाव आणि त्यात गरम वडा सोबत मिळणारी थंड चटणी म्हणजे एक नंबर कॉम्बिनेशन म्हणता येईल.

ठिकाण: कालिदास नाट्यगृह, मुलुंड

किंमत: 25 रुपये

मुंबईत कदाचित एका छोटेखानी दुकानात सुरु झालेली ही वडापावची परंपरा आज जगविख्यात आहे. इतकेच नव्हे तर जगभरात बॉम्बे बर्गर म्ह्णून प्रसिद्ध असलेला हा पदार्थ एका अर्थी मुंबईची ओळख बनला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif