Vaccine Tourism in Russia: 1.30 लाखात रशियाची 24 दिवसांची ट्रीप आणि Sputnik V चे दोन डोस; भारतीयांसाठी ट्रॅव्हल्स कंपनीचे पॅकेज सुरू
दरम्यान या शिवाय 10 हजार व्हिसा फी असेल.
भारतामध्ये लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशातच वॅक्सिन टुरिझमचे (Vaccine Tourism in Russia) पर्याय खुले करण्याचा विचार सुरू असतानाच आता रशिया हा नवा पर्याय समोर आला आहे. दिल्लीच्या एका ट्रॅव्हल कंपनीकडून 24 दिवसांची रशिया ट्रीप पॅकेज आणि त्यामध्ये स्फुटनिक वी (Sputnik-V) लसीचे दोन्ही डोस असे पॅकेज दिलं जात आहे. याची किंमत अंदाजे 1 लाख 30 हजार आहे. लोकांना रशिया फिरण्यासोबतच 21 दिवसांच्या फरकाने या टूर मध्ये स्फुटनिक वी लसीचे दोन डोस देखील घेता येणार आहेत.
TOI सोबत बोलताना या ट्रॅव्हल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पर्यटक रशिया मध्ये पोहचतील तेव्हा लगेच दुसर्या दिवशी त्यांना लस दिली जाणार आहे. 15 मे दिवशी या ट्रॅव्हल एजंसीने पहिला ग्रुप दिल्ली- मॉस्को वारीवर नेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर्स होते. आता दुसरी बॅच 29 मे दिवशी रवाना होणार आहे आणि यामध्येही बर्याच डॉक्टरांचा समावेश आहे. पुढे जून महिन्यात अशाच प्रकारे काही ट्रीप्स होतील. या व्हॅक्सिन टुरिझम मध्ये पर्य्टक 3 दिवस सेंट पीटर्सबर्ग आणि अन्य दिवस मॉस्को मध्ये असतील.
1.30 लाखांच्या पॅकेज मध्ये Aeroflot flights ची तिकीट, ब्रेकफास्ट, डिनर काही लोकल साईट सिईनची फी यांचा समावेश असेल. दरम्यान या शिवाय 10 हजार व्हिसा फी असेल.(हेही वाचा: रशियाची Sputnik V लस ठरली 95 टक्के प्रभावी).
सध्या रशिया हा असा एक देश आहे जिथे भारतीयांना व्हॅक्सिन घेण्यासाठी प्रवेश खुला आहे. त्यांना केवळ सोबत आरटी पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट ठेवायचा आहे. त्यांना रशियात आल्यानंतर क्वरंटीन देखील राहण्याची गरज नाही. व्हॅक्सिन टुरिझम साठी सुरूवातील दुबई ने असा प्रयत्न केला होता मात्र सध्या दुबई मध्ये भारतीयांना प्रवेश बंदी आहे. अमेरिकेतही जेव्हा लस खुली झाली होती तेव्हा मुंबईच्या एका टुरिस्ट कंपनीने 1.7 लाखात 4 दिवसांची अशाप्रकारची टूर सुरू केली होती.