Uber launches Shikara service in Dal: उबरवर टॅक्सी नाही…'शिकारा' सुद्धा बुक करता येणार; काश्मीरच्या दल सरोवरात आता उबेरद्वारे बोट बुकींग सेवा (Watch Video)

सेवा घाट क्रमांक 16 पासून सुरू होते आणि 800 रुपयांमध्ये 1 तासाची राइड देते. यात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पर्यटक सहा प्रमुख ठिकाणांना भेट देऊ शकतात. उबेर शिकारा राइड 12 तास ते 15 दिवस अगोदर बुक केल्या जाऊ शकतात.

Photo Credit- X

Uber Launches Shikara Service in Dal: उबरची सेवे रस्तेमार्गावर लिमिटेड न ठेवला सेवेचा विस्तार वाढवण्याच्या उद्देशाने उबरने श्रीनगरच्या डल लेक(Dal Lake)मध्ये 'उबर शिकारा' सेवा सुरू केली आहे. एक अग्रगण्य वाटचाल म्हणून उबरने भारतातील पहिली जलवाहतूक सेवा Uber Shikara सुरू केली आहे. ही नवीन ऑफर वापरकर्त्यांना उबर ॲपद्वारे बुक करता येणार आहे. ज्यामुळे काश्मीरमधील पारंपारिक वाहतुकीला नवे आधुनिक वळण मिळाले असल्याचे म्हटले जात आहे. उबर शिकारा सेवा(Shikara Ride) ही आशियातील आपल्या प्रकारची पहिली सेवा आहे जी व्हेनिस सारख्या युरोपियन शहरांमध्ये वापरली जाते. सुरुवातीला, उबरने सात शिकारांना समाविष्ट करून ही सेवा सुरू केली. त्यानंतर मागणीच्या आधारावर हळूहळू त्याचा विस्तार करण्यात आला. (हेही वाचा:Magical Destinations in India for Christmas: ख्रिसमस सुट्टी साजरी करण्यासाठी कुठे जाल? जाणून घ्या भारतातील 7 कास ठिकाणे)

ही सेवा घाट क्रमांक 16 पासून सुरू होते आणि 800 रुपयांमध्ये 1 तासाची राइड देते. यात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पर्यटक सहा प्रमुख ठिकाणांना भेट देऊ शकतात. उबेर शिकारा राइड 12 तास ते 15 दिवस अगोदर बुक केल्या जाऊ शकतात. उबरने कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे स्थानिक समुदायाला थेट आर्थिक फायदा होईल. या सेवेमुळे शिकारा चालकांना थेट आर्थिक फायदा, पारंपारिक वाहतूकीची जपणूक,स्थानिक पर्यटनाला चालना हे समोर ठेवणयात आले आहे.

जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या सेवेचे कौतुक केले आहे. 'तंत्रज्ञानाला सांस्कृतिक जोड मिळाल्यास वारसा वाढवू शकतो याचा हा पुरावा आहे. असे ते म्हणाले, नवीन सेवेमुळे पर्यटकांना शिकारा राईडचा आनंद घेता येईल', असे ते म्हणाले.

ही सेवा पर्यटकांसाठी फायदेशीर तर आहेच, पण शिकारा चालकांसाठी रोजगाराची संधी आहे. दल सरोवरात उबेर शिकारा लाँच करणे हे स्थानिक व्यवसाय मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. उबेर शिकारा सेवेद्वारे आगाऊ बुकिंग केल्यामुळे पर्यटकांना त्यांच्या प्रवासाच्या वेळेचे अधिक चांगले नियोजन करता येणार असून शिकारा चालकांनाही त्यांच्या बुकिंगबाबत जागरुकता येईल. यामुळे पर्यटक आणि शिकारा चालकांचा वेळ तर वाचेलच शिवाय शिकारा वेळेवर पोहोचवता येईल.

काय आहे शिकारा सेवा?

शिकारा या श्रीनगरमधील दल सरोवर आणि इतर पाणवठ्यांवर आढळणाऱ्या पारंपारिक लाकडी नौका (बोट) आहेत. या बोटींवर वाहकासह सहा जण प्रवाह करू शकतात. काही शिकारा अजूनही मासेमारी आणि वाहतुकीसाठी वापरली जातात. परंतु आता ते मुख्यतः पर्यटकांनी नयनरम्य दल सरोवराच्या आसपासच्या निसर्गरम्य राइड्ससाठी वापरले आहेत. दल सरोवरला 'श्रीनगरचे रत्न' म्हटले जाते. दल सरोवर हे गोड्या पाण्याचे तलाव आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. याचे मोठे सांस्कृतिक आणि व्यावसायिक महत्त्व आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now