Tejas Thackeray यांनी पश्चिम घाटात शोधल्या ‘घाटियाना’ आणि ‘सह्याद्रीना’ कुळातील खेकड्यांच्या प्रजाती
के. पाटी यांनी केलेले हे संशोधन फ्रान्सच्या ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’ द्वारा प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘झूसिस्टेमा’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे.
सह्यद्री घाटातील (Sahyadri Ghat) खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या प्रजातींपैकी दोन ‘घाटियाना’ (Ghatiana) कुळातील दोन आणि तीन प्रजाती या ‘सह्याद्रीना’ कुळातील आहेत. तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या या प्रजातींचा (Crab Species) शोध लावला आहे. स्वत: तेजस ठाकरे यांनी याबाब आपल्या इंस्टाग्राम पेजवरुन माहिती दिली आहे. खेकड्याच्या या पाचही प्रजाती पश्चिम घाटातील गोड्या पाण्यात आढळतात. तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी खेकड्याच्या या प्रजाती शोधल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोयना परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाट परिसरात ‘घाटियाना ड्यूरेली’ कुळातील चार प्रजाती सापडल्या. तर गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये ‘घाटियाना रौक्सी’ ही प्रजात आढळली. ही प्रजात प्रदेशनिष्ठ आहे. ‘ठाकरे वाइल्ड फाउंडेशन’ चे संस्थापक तेजस उद्धव ठाकरे आणि ‘झूलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ चे संशोधक एस. के. पाटी यांनी केलेले हे संशोधन फ्रान्सच्या ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’ द्वारा प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘झूसिस्टेमा’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. (हेही वाचा, Tejas Thackeray यांचे नवे संशोधन, मुंबईत आढळली 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती, नाव ठेवले 'Rakthamichtys Mumba')
आजवर सह्याद्री घाटात आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ ‘सह्याद्रीना कुळातील 10 प्रजातींबाबतच माहिती होती. मात्र, तेजस ठाकरे यांच्या संशोधनानुसार या प्रजातींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.
तेजस ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर खेकड्यांच्या नव्या प्रजातींबाबत माहिती देताना म्हटले आहे की, पश्चिम घाटात विविध प्रकारची जैवविविधता आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. खेकड्यांच्या नव्या प्रजातींमुळे पुन्हा एकदा पश्चिम घाटातील विविध प्रजातींवर नव्याने प्रकाश पडला आहे. आज नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण काम करणारे संशोधक जेराल्ड मालकॉम ड्यूरेल यांचे नावे ‘घाटियाना ड्यूरेली’ या खेकड्यांच्या प्रजातीला देण्यात आले, असल्याचे तेजस ठाकरे यानी आपल्या इस्टापोस्टमध्ये म्हटले आहे.