ताजमहाल नाही, तर मुंबईची झोपडपट्टी धारावी ठरले आशियातील लोकप्रिय पर्यटन स्थळ, जाणून घ्या संपूर्ण यादी

यावरून हे स्पष्ट जाणवते की पर्यटकांसाठी स्थानिक संस्कृती अनुभवणे हा ट्रिपमधील सर्वात रोमांचकारी अनुभव आहे.

Dharavi beats Taj Mahal in Travellers' Choice experiences 2019 (Photo Credits: Wikimedia Commons)

भारतामध्ये पर्यटनाच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळते. अजिंठा, ताजमहाल, कुतुब मिनार यांसारखी अनेक ठिकाणे .पाहण्यासाठी जगभरातून इथे पर्यटक येत असतात. नुकतीच ‘ट्रॅव्हलर्स चॉइस एक्सपिरिएन्स 2019-इंडिया’ची (Travellers’ Choice Experiences 2019- India) यादी प्रसिद्ध झाली आहे, यानुसार मुंबईमधील ‘धारावी झोपडपट्टी’चा (Dharavi Slum) फेरफटका हे पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे. आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय आकर्षणांच्या यादीमध्येही फक्त धारावीला स्थान मिळाले आहे. यावरून हे स्पष्ट जाणवते की पर्यटकांसाठी स्थानिक संस्कृती अनुभवणे हा ट्रिपमधील सर्वात रोमांचकारी अनुभव आहे.

या यादीमध्ये ‘जुन्या दिल्लीमध्ये मोटारसायकलवरून फेरफटका मारणे’ ही गोष्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ताजमहाल आणि लाल किल्ल्याला भेट देणे, दिल्लीमध्ये शॉपिंग करणे, बॉलिवूड दर्शन, दिल्लीच्या जुन्या बाजारामध्ये फेरफटा मारणे, मास्तरजी की हवेलीला भेट, नवीन तसेच जुन्या दिल्लीमधील एका दिवसाची भटकंती, मुंबई दर्शन, दिल्लीमधील संजय कॉलिनी झोपडट्टीला भेट या गोष्टींचा समावेश आहे.

ट्रॅव्हल साइट TripAdvisor ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. भारतातील तसेच जगभरातील लोकांनी वर्षभरात बुक केलेल्या ठिकाणांवरून ही यादी बनवण्यात आली आहे.

जगातील लोकप्रिय आकर्षणे  -

आशिया खंडातील लोकप्रिय आकर्षणे  -