IPL Auction 2025 Live

Vistadome Coach सह धावणार्‍या नव्या Deccan Express ची फीचर्स, वेळापत्रक ते प्रवासादरम्यान काय काय पाहू शकाल? जाणून घ्या सर्व काही

मुंबई -पुणे प्रवासादरम्यान नेरळ जवळ माथेरान हिल्स, सोनगीर हिल्स, उल्हास नदी, उल्हास व्हॅली, खंडाळा, लोणावळा आणि बोगद्यांमधून जाणारी ट्रेन यामुळे प्रवास विलक्षण अनुभव देणारा होणार आहे.

Mumbai-Pune Deccan Express Special Train | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई पुणे मार्गावरील डेक्कन एक्सप्रेस ला (Mumbai-Pune Deccan Express Special Train) आजपासून विस्टाडोम कोच (Vistadome Coach) लावत प्रवाशांसाठी ही ट्रेन आता अजून आरामदायी आणि सुखकर प्रवास अनुभवासाठी सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवस कोरोना संकटाच्या दुसर्‍या लाटेमध्ये डेक्कन एक्सप्रेस अपुर्‍या प्रवासी संख्येमुळे बंद होती पण आता रेल्वे प्रशासनाने ती नव्या अंदाजात पुन्हा प्रवाशांसाठी खुली केली आहे. कोकण रेल्वेमार्गावर याआधी काही ट्रेनला विस्टाडोम कोच देण्यात आला आहे त्याच धर्तीवर कोकण रेल्वेने ही सोय डेक्कन एक्सप्रेसला जोडल्याने मुंबई-पुणे प्रवास आता अधिक अल्हाददायक होणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या विस्टाडोम मधून प्रवास करण्याची मज्जा अजूनच वाढणार आहे. दरम्यान तुम्हांलाही येत्या काही दिवसात डेक्कन एक्सप्रेस च्या या विस्टाडोम कोच मधून प्रवास करायचा असेल तर नक्की जाणून घ्या त्याच्या नेमक्य मुंबई, पुणे स्थानकातील वेळा काय? तिकीट कसं बुक कराल तसेच या स्पेशल कोच मध्ये कोणकोणत्या सुविधा असतील या तुमच्या मनातील सार्‍या प्रश्नांची उत्तरं

डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचची वैशिष्ट्यं

डेक्कन एक्सप्रेसच्या वेळा

मुंबईतून सीएसएमटी स्थानकातून 01007 ही Mumbai-Pune Deccan Express Special train सकाळी 7 वाजता सुटणार आहे तर पुण्यात ती 11 वाजेपर्यंत पोहचणार आहे. पुन्हा पुण्यावरून 01008 दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही ट्रेन सुटणार असून मुंबईत संध्याकाळी 7 पर्यंत मुंबईत येणार.

पाहण्यासारखी दृश्य

पावसाळ्याच्या दिवसात विस्टाडोम मधून पश्चिम घाटातील हिरवळ पाहण्याची मज्जा काही औरच आहे. पण त्यासोबतच या मुंबई -पुणे प्रवासादरम्यान नेरळ जवळ माथेरान हिल्स, सोनगीर हिल्स, उल्हास नदी, उल्हास व्हॅली, खंडाळा, लोणावळा आणि बोगद्यांमधून जाणारी ट्रेन यामुळे प्रवास विलक्षण अनुभव देणारा होणार आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी धबधबे देखील पहायला मिळू शकतात.

www.irctc.co.in वर या स्पेशल ट्रेनचं बुकिंग करता येणार आहे. सध्याच्या कोविड 19 नियमावलीनुसार तिकीट असलेल्यांनाच या ट्रेनने प्रवास करता येणार आहे. या विस्टाडोमचं तिकीट हे शताब्दी क्लास ट्रेनच्या  executive chair class च्या तिकीटाप्रमाणेच असेल. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला तिकीट दरात सवलत नसेल.

कोणकोणत्या स्थानकावर थांबा

डेक्कन क्विनला दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (01007 या नंबरला केवळ), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगर असे थांबे असतील.

मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस स्पेशल ट्रेनला एक विस्टाडोम कोच, 3 एसी चेअर कार, 10 सेकंड क्लास सिटींग आनि एक सेकंड क्लास सिटिंग असणार आहे.